साळी समाजातील गुणवंत विद्याथ्र्यांना पारितोषिके

अकोला


विविध क्षेत्रात यशस्वी विद्याथ्र्यांचे व इतरांचे कौतुक
साळी समाज विश्वस्त मंडळाचा उल्लेखनिय उपक्रम


साळी समाज मंडळाचे वतीने भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव व गुणवंत विद्याथ्र्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. साळी समाज मंडळ, अकोला यांचे वतीने विश्वाचे प्रथम वस्त्र निर्माते भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सवाची सांगता करून समाजातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींना बक्षिस वितरण तसेच विशेष कामगीरी करण्याच्या समाज बांधवांचा नुकताच सत्कार करण्यात आला आहे.


स्थानिक डाबकी रोड वरील नंदाने मंगल कार्यालयामध्ये श्री जिव्हेश्वर भगवान यांचे प्रतिमेला कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे साळी समाज भूषण व शिक्षणाधिकारी, माध्यमिक, जिल्हा परिषद, अकोला सुचिताताई पाटेकर यांनी पुष्पहार करून त्यांचेसह सचिव तथा मनपा नगरसेवक सतीशदादा ढगे, उत्सव समितीचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर दखने, मार्गदर्शक निळकंठराव मांडवगडे, सहाय्यक विक्रीकर अधिकारी आनंदराव पाटेकर, सहसचिव विष्णुपंत गोटे यांनी द्विप प्रज्वलन करून श्री जिव्हेश्वर भगवानाचे तैलचित्रास पुष्पहार अर्पन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.वसंतराव गाढवे हे होते. सदर प्रसंगी मंचावर माजी जिल्हा शल्य चिकीत्सक अशोकराव भोपाळे, उमेशचंद्र पाटणकर, गोविंदराव ठणगण असे मान्यवर उपस्थित होते. तदनंतर साळी समाजातील वर्ग १ ते १० व १२ वी तसेच बी.एस्सी., बि.कॉम, बी.ए. च इतर पदवीधर/पद्व्युत्तर परिक्षेत विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झालेल्या एकूण ५५ विद्यार्थी-विद्यार्थीनींना मंडळाद्वारे वस्तु स्वरूपातील तसेच समाज बांधवाकडून वैयक्तिकरित्या प्रयोजित केलेल्या हजारो रूपयांचे रोख पारितोषीके वितरीत करून त्यांना गौरविण्यात आले. यामध्ये कु. स्वरा डोहोरे, कु. निहरिका कलाने, हिरकणी इटकीकर, मृन्मई वाघमारे, अक्रांत बेलसरे, क्रियांश लव्हाळे, आरोई धमाले, नंदिनी लासकर, कृणाल ढगे, पार्थवी पुंड, श्रध्दा दातखोर, संस्कार तेलंगे, कु. भूमिका घाटे, सौरभ बरके, प्रतिक बढोणे, श्रेयश मुळे, वैशाली गुंडगे, गौरव खोलापुरे यांनी तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये अथर्व वसंतराव गाढवे याने एम.बी.बी.एस. व अभियांत्रीक क्षेत्रातील शाम विलास कावळे व कु. समिक्षा सरोदे हे विशेष प्राविण्याने परिक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांचा विशेष सत्कार करून गौरविण्यात आले.
तसेच याप्रसंगी डॉ. अशोकराव भोपाळे व डॉ. मधुकरराव असलमोल यांनी वयाची ७५ वर्षे यशस्वीपणे पूर्ण केल्याने अमृत महोत्सवानिमित्त त्याचप्रमाणे मनपा बांधकाम विभागातून केशवराव रामचंद्रजी ढगे, जिल्हा परिषद मधील कृषि विभागातून पुरूषोत्तम ओंकारराव गोटे तर वित्त विभागामधुन ज्ञानेश्वर दखने, सहाय्यक लेखाधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सिद्धांत सतीश ढगे यांनी इन्स्पायर अवार्डमध्ये भाग घेवून बनविलेल्या यु व्ही डिसइंफेक्टंट प्रोजेक्टचा विदर्भातील एकूण २१ प्रोजेक्टमध्ये निवड करण्यात येवून महाराष्ट्र शासनातर्फे दहा हजाराचे बक्षीस प्राप्त केले तसेच एन एम एम एस मध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांक सिध्दांत यांंने पटकावला. तर स्वाती गोटे (तेलंगे) व सुनिल केवाळे यांनी कोविड-योध्दा म्हणून आणि कु. भक्ती मेन, कु. स्वरा डाहोरे, प्रणय लासकर, विनोद तांबे, सौख्यदा कोकोटे, अनुक्रमे माध्यमिक शिष्यवृत्ती, निबंध / स्त्रोत्र स्पर्धा, आर्मी कारगीर, राखीव पोलीस निरिक्षक, कथ्थक संगीत इत्यादी क्षेत्रात विशेष कामगीरी केल्याबद्दल समाजातर्फे मान्यवरांचे हस्ते सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता निळकंठराव मांडवगडे, उमेशचंद्र अभिलाष गोटे, ज्ञानेश्वर दखने, विनोद केवाळे, सुशिल टोपले, मारोतराव माटोळे, पाटणकर, संजय टोपले, विश्वनाथ सरोदे, वसंतराव गाढवे, जितेंद्र कुरळकर, किशोर तायडे, नरेंद्र धमाले, संदिप ढगे, सुनिल लासकर, श्यामल टोपले, गोविंद ठणगण, प्रकाश गणेशे यांचेसह सहसचिव विष्णुपंत गोटे व सचिव तसेच मनपा नगरसेवक सतीशदादा ढगे यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *