बंद गाडी ढकलण्यात वाहनचालकांची कसरत
अकोला जिल्हा परिषदेमधील प्रकार
ग्राम पातळीवरील विकासाचा गाडा ओढणाNया जिल्हा परिषदेच्या शासकीय वाहनाची अवस्था मात्र दयनीय झाली आहे. मिनी मंत्रालयातूनच बाहेर निघताच वाहनाने सोडला जीव, गाडी बाहेर काढण्यासाठी शासकीय वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली आहे.
ग्राम पातळीवर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी – अधिकारी यांचे दौरे मोठ्या प्रमाणात सुरू असतात. त्यात शासकीय वाहनाचा उपयोग मोठ्या प्रमाणात अधिकारी – पदाधिकारी करतात. मात्र जिल्हा परिषदेच्या शासकीय वाहनाची अवस्था बघता अनेक शासकीय वाहने खटारा झाली आहेत. जिल्हा परिषदेच्या आवारात अनेक शासकीय वाहने बंद अवस्था मधे पडून आहेत. या शासकीय वाहनांच्या दुरुस्तीच्या विषयावर प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून आले. शासकीय वाहनांची अवस्थाच जर दयनीय तर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न कसे मार्गी लागत असतील असा प्रश्न आहे.