शिवभक्त मंडळाची मंदिरात बैठक

अकोला

हजारो भाविक दर्शनासाठी येणार
शिवभक्त पालखी मंडळांची बैठक


राजराजेश्वर मंदिरात गर्दी होणार नाही, तसेच पालखी व कावड महोत्सवाचे स्वयंघोषित अध्यक्ष पदावरुन जोरदार वाद सुरु असून या विषयी बुधवार, १७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता निर्णय होईल असे सामाजिक कार्यकर्ता चंदू सावजी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राजराजेश्वर मंदिरात होत असलेली गर्दीचे योग्य नियोजन व्हावे. कावड व पालखी उत्सव मंडळांचे निर्वाचित अध्यक्ष असावा यासाठी बुधवार १७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता राजेश्वर मंदिरात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती चंदू सावजी यांनी दिली. दरम्यान, राजेश्वर मंदिरातील कावड उत्सवात सहभागी मंडळामध्ये या उत्सवानिमित्त अध्यक्ष पदासाठी चढाओढ असून या विषयी उद्या नेमके कोण अध्यक्ष घोषित होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राजराजेश्वर मंदिर संस्थान याचा यात कितपत सहभाग असतो याकडे सर्वांचे लक्ष असून कावड उत्सव समितीचे अध्यक्ष कोण होते याची चर्चा मंडळांमध्ये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *