खांद्यावर भगवी पतका मनात देशभक्ती
गजानन महाराज भक्तांची अशी ही शिस्त
श्री संत गजानन महाराज भक्तांची शिस्त आज वाशिम ते शेगाव पायदळ वारीत दिसली. सरकारने स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता करण्यासाठी बुधवारी ११ वाजता राष्ट्रगीत गायन करण्याचे आवाहन केले होते. त्यास वारकNयांनी देखील साथ दिली.
श्री संत गजानन महाराजांच्या भक्तांची शिस्त आज राष्ट्रीय महामार्गावर दिसली. त्यांनी थेट रस्त्यावर पालखी थांबवित सामुहिकपणे राष्ट्रगीत गायन केले. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील सुकांडा या गावातील हे वारकरी आहेत. त्यांचे शेगाव पायदळ वारी पालखी सोहळ्याचे आठवे वर्ष आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रगीत गायन करत त्यांची पालखी शेगाव ला रवाना झाली.पालखी सोहळा मध्ये पालखी प्रमुख सुनिल पालवे, बबन आंधळे, शिवाजी आंधळे, कैलास घुगे, विलास घुगे, गोपाल बनाइतकर, जगदीश सांगळे, भास्करराव घुगे, सरपंच कैलासराव घुगे, चंद्रकांत घुगे, डॉ. जगदीश घुगे आदींचा सहभाग होता.