अकोला : अब्दुल्ला कॉलनीत सुरू असलेल्या वरली मटका जुगारावर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने कारवाई करत सात जणांना अटक केली. आरोपींमध्ये प्रमोद आठवले (३०, रा. गीता नगर), गणेश लांडे (३३, रा. घनेगाव), गोविंद सोनी (३२, रा. शिवर), गजानन आपोतीकर (३७, रा. महाकालीनगर), शेख कलीम शेख सलीम (२३, रा. बिलाल मस्जिद), शुभम गायकवाड (२५, शात्रीनगर), विशाल गुंजाळे (३३, रा. खडकी) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून रोख २० हजार ५०० रुपयांसह एकूण ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध खदान पोलिसांत गुन्हा नोंदवला. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे.