शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, प्रत्येकाने ते पिलेच पाहिजे : घोलप

अकोला

राष्ट्रीय चर्मकार महासंघ अकोलाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व समाज मेळाव्याचे अायाेजन करण्यात अाले हाेते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, प्रत्येकाने ते पिलेच पाहिजे, असे प्रतिपादन महासंघ संस्थापक अध्यक्ष बबनराव उर्फ नानासाहेब घोलप यांनी केले.
शिक्षण हे प्रत्येक नागरिकाला घेणं आवश्यक आहे. गत अनेक वर्षांपासून सरकारने कायदाच केला आहे. चर्मकार समाजानेही प्राधान्याने शिक्षणाला महत्व देणे अावश्यक अाहे, असेही नानासाहेब घाेलप म्हणाले. कार्यक्रमाला रामभाऊ उंबरकर, कुलगुरू दिलीपराव मालखेडे, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, उपजिल्हाधिकारी वाशीचे राजेश वजीरे, आरसीएमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, राष्ट्रीय प्रवक्ता रवींद्र राजुस्कर यांचे मार्गदर्शन लाभले. चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थी ६० टक्क्यांपेक्षा जास्त तसेच १० वी १२वीत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी यांचा सत्कार जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे करण्यात अाला.
सूत्रसंचालन संध्या घोपे, वर्षा चिमकर यांनी केले. आभार जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे यांनी केले. प्रास्ताविक राष्ट्रीय चर्मकार महासंघ विदर्भ प्रमुख गजानन भटकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रामुख्याने िज. प. सदस्या वर्षा वजीरे, प्राचार्य श्रीप्रभू चापके, श्रीकृष्ण सावळे, प्रा. सचिन गव्हाळे, प्रा. वासुदेव डांगे, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, आयुक्त सामाजिक न्याय विभागाच्या अनिता राठोड, चर्मोद्योग विकास मंडळचे व्यवस्थापक अशोक खंडारे, मीनाक्षी पानझाडे, जि. प. सदस्य गोपाल भटकर, डॉ. गणेश बोबडे, सतीश सरदार, गजानन वझीरे, बाळू हिरेकर, संज्योती मांगे, रामभाऊ ताजने, मानीराम टाले, अरुण गवई, राम शेगोकार, के. टी. पद्मने, भास्कर शिरभाते, किसनराव देऊलकर, रघुनाथ धुमाळे, निरंजन गव्हाळे, अनिल डांगे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन महानगराध्यक्ष शिवलाल इंगळे, महासचिव सुनील गवई, पांडुरंग वाडेकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रतिभा शिरभाते, महिला महानगर अध्यक्ष छाया इंगळे, युवा जिल्हाध्यक्ष सुमित पानझाडे यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *