लिटील ग्रीन्स ईको प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन

अकोला


शहरात पहिल्यांदा भरले असे प्रदर्शन
टेरेरियम लायब्ररी सुर करण्याचा मनोदय


अकोला शहरात पहिल्या लिटील ग्रीन्स ईको प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन झाले. सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. अभय पाटील आणि आर आर सी केबल नेवटर्वâच्या संचालिका सौ. कल्पनाताई देशमुख यांच्या शुभ हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन झाले.


बंद काचेच्या डब्यातील झाडे आणि खेळणी यांचे टेरेरियम, तसेच बॉटल आर्टचे प्रदर्शन येथील जठारपेठ स्थित दिवेकर वाचनालयात आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे आयोजन मानद विद्यावाचस्पती पल्लवी दिवेकर यांनी केले. शहरात टेरेरियम लायब्ररी सुरु करणार असल्याची घोषणा दिवेकर यांनी यावेळी केली. छोटे गार्डन, ईको भेट वस्तु यांचे नवे दालनच या माध्यमातून अकोलेकरांना उपलब्ध झाले आहे. या प्रदर्शनात नेचरविलचे जयेश लगड यांनी विविध दूर्मिळ रोपे देखील उपलब्ध करुन दिली आहे. तर दिपाली खरोटे हिचे बॉटल आर्ट या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहे. दिपाली हिच्या चित्रकला प्रदर्शनी आणि स्केचेस व प्रिती भाकरे यांचे घरघुती चॉकलेट्स देखील प्रदर्शन होते. शनिवार व रविवार रोजी जठारपेठ येथे दिवेकर वाचनालयात हे प्रदर्शन झाले. या प्रदर्शनाला यशस्वी करण्याकरिता माधवी तायडे, अंजली ताकवाले, श्वेता लगड, रितेश झामरे, शांबवी तायडे, कनिष्क दिवेकर यांनी योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *