
सकाळी विवेक मंदिर हायस्कूलच्या मुलांना घेऊन जाणारी खासगी व्हॅन बायपास रोडवर उलटली. मात्र सुदैवाने या अपघातात सर्व म्हणजे ३० विद्यार्थी थोडक्यात बचावले. गोंदिया येथील विवेक मंदिर हायस्कूलचे विद्यार्थी सकाळी खासगी व्हॅनने शाळेत येत होते. दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने व्हॅन उलटली. मात्र या घटनेत कुणालाही इजा झाली नाही. विवेक मंदिरची मुले ज्या व्हॅनमधून शाळेत येत होती, ती व्हॅन शाळेची नसून पालकांनी एकत्रित येऊन सुरू केलेली |असल्याची माहिती मुख्याध्यापक अशोककुमार कर्ता यांनी दिली. यानुसार शाळेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून सर्व मुलांना शाळेत नेले आणि प्राथमिक उपचार करून घरी पाठवले. नियमानुसार स्कूल बस, मिनीबस, व्हॅनमध्ये ड्रायव्हर, क्लिनर आणि लेडीज केअर टेकर असावा. तशी सुविधा विवेक मंदिरासह अनेक स्कूल बसमध्ये आहे, मात्र या खासगी वाहनांमध्ये फक्त चालक असतो.