मनपा प्रशासनाची उदासीनता
अकोला महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांना शहरात प्रवास करण्यासाठी सोय उपलब्ध व्हावी. या करिता १८ च्या वर ए.एम.टी बस भाडेतत्वावर घेण्यात आल्या होत्या. परंतु आता त्याच ए.एम.टी बस नेहरू पार्क चौक स्थित पाण्याच्या टाकीच्या आवारात धूळ खात पडल्या आहेत.
एकीकडे कोट्यावधी रुपये खर्च करून बस विकत घेण्यात आल्या, आणि त्याच बस आज उघड्यावर धूळ खात पडल्याने शहरातील नागरिकांमध्ये महानगरपालिका प्रशासना बाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्या जात आहे. इंधन वाढीचा फटका शहरातील ऑटो चालकांना बसल्याने त्यांनी ऑटो प्रवास भाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे, त्याचा भुर्दंड शहरातील नागरिकांच्या खिशाला बसत आहे. अकोला महानगरपालिका प्रशासनाने बंद पडलेल्या ए.एम.टी बस लवकर सुरू करून नागरिकांना प्रवासा करिता सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केल्या जात आहे.