सांगली : स्वागत कमान उभारणीला सेनेच्या दोन्ही गटांना पोलीसांची हरकत

Maharashtra State

शिवसेनेच्या दोन्ही गटांना मिरजेतील महाराणा प्रताप चौकामध्ये स्वागत कमान उभारण्यास स्थानिक पोलीसांनी हरकत घेतली असून या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात या जागेवर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटांनी हक्क सांगितल्याने पोलीसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून ही हरकत घेतली आहे.मिरजेतील गणेश विसर्जन मार्गावर स्वागत कमानी उभा करण्याची गेल्या २५ वर्षाची परंपरा आहे. मुख्य मार्गावर हिंदू एकता आंदोलन, मराठा महासंघ, विश्‍वशांती संघटना, धर्मवीर संभाजी महाराज तरूण मंडळ यांच्या भव्य दिव्य स्वागत कमानी हे मिरजेचे आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरले आहे.

सलग तीन वर्षानंतर गणेशोत्सव निर्बंध मुक्त वातावरणात साजरा होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मात्र, महाराणा प्रताप चौकामध्ये शिवसेनेची स्वागत कमान उभारण्यात येते. राज्यात शिवसेनेत फूट पडल्याने स्थानिक पातळीवरही शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही गटांनी महाराणा प्रताप चौकामध्ये स्वागत कमान उभारण्यासाठी पोलीस ठाण्यात ना हरकत दाखला देण्याची मागणी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *