दोन दिवसापासून धरणात बुडालेला युवकाचा मृतदेह शोधुन काढला

Crime अकोला

30 ऑगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात येत असलेल्या गोप सावंगी येथील उर्द मोर्णा धरणाच्या मागच्या साईडला रस्त्यावर वरील पुलाजवळ भागवत जहागीर काळे वय अंदाजे (25) वर्षे रा.गोप सावंगी ता.मालेगाव येथील रहिवासी हा 30 ऑगस्ट रोजी दुपारी अंदाजे 4:00 वाजताच्या दरम्यान पाण्यात पडला यावेळी स्थानिकांनी शोध घेतला असता काहीच मिळुन याची माहिती मालेगाव तहसीलदार रवीकुमार काळे सर यांनी अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील मा.से.आ.व्य. फांउडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले होते.आज सकाळी मेडशी येथील पथक प्रमुख दीपक सदाफळे यांचे पथकाचे शाखा मेडशी येथील सहकारी राजेश साठे,नथ्थुभवानी वाले आणी शाखा मंगरूळपीर येथील सहकारी अतुल उमाळे,लखन खोडे,शुभम भोपळे, यांना घटनास्थळी पाठविले आणी फोनवरून मार्गदर्शन करत घटनास्थळी तहसीलदार रवी काळे सर यांच्या आदेशाने आणी तलाठी घुगे साहेब यांच्या सहकार्याने सर्च ऑपरेशन चालु केले. या सर्च ऑपरेशनमध्ये वनोजा येथील साळुंकाबाई महाविद्यालयाची रासेयो आपत्ती व्यवस्थापन टीमचे आदीत्य इंगोले सह सदस्य सहभागी झाले होते. सकाळपासुन चालु केलेले सर्च ऑपरेशनमध्ये यश न येत असल्याने शेवटी जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी तलाठी घुगे साहेब आणी गाडगेबाबा आपत्कालीन पथकाचा राजु साठे यांना काठया आणी काटेरी तार आणुन तीन काठीला तार चैन करायला सांगीतले नंतर यासोबत साखळी पद्धतीने सर्च ऑपरेशन करायला सांगीतले आणी तलाठी दत्तात्रेय घुगे यांच्या फोनवरून विडीयो काॅलवर राहुन मार्गदर्शन चालुच ठेवले आणी शेवटी काठीला बांधलेल्या तारात आज सकाळी 11:45 मीनटाला 15 फुट खोल पाण्यातील भागवतचा मृतदेह अडकुन बाहेर आणला यावेळी घटनास्थळी मालेगाव पोलीस कर्मचारीसह मेडशी चे मं.अ.एन.एम. इंगळे,तलाठी दत्तात्रेय घुगे,कोतवाल दीपक ताजने आणी गावकरी हजर होते,….यावेळी स्तानिक पातळीवरील नागरिकांचे मोठे सहकार्य लाभले अशा माहीती तलाठी घुगे यांनी दीली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *