जालना: राज्यभरात गणेशोत्सव असल्याने वातावरण भक्तीमय झालं आहे. अशा भक्तीमय वातावरणातही जालन्यात विद्युत पुरवा अनेकदा खंडीत केला जातोय. याच कारणावरुन मंठा शहरातील सामजिक कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात जाऊन कार्यालयाची तोडफोड केली आहे. या तोडफोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
सामजिक कार्यकर्ता असलेल्या दवणे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये महावितरणविरोधात संताप व्यक्त केला आहे. दवणे म्हणाले, गेल्या दोन वर्षांच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांनंतर आता उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करत केला जात आहे. मात्र, महावितरणकडून काल, गुरुवारी वार्ड क्रमांक सहामध्ये असलेला ट्रान्सफॉर्मर दुरुस्त केल्यानंतरही विद्युत पुरवठा खंडित केल्या जात आहे. यामुळे उत्सवादरम्यान आयोजित कार्यक्रम साजरे केले जाऊ शकत नाही. या संदर्भात महावितरण विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांना वारंवार सूचना आणि फोन करुनही ते कुठलाच प्रतिसाद देत नसल्याने दवणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह महावितरणच्या कार्यालयात शिरत कार्यालयाची तोडफोड केली.