“पैसे भाजपाकडून घ्या काम ‘आप’चं करा”, केजरीवालांचं गुजरातमधील BJP कार्यकर्त्यांना आवाहन

देश – विदेश

गुजरातमध्ये वर्षअखेरीला विधानसभेची निवडणूक होणार असून भाजपाच्या बालेकिल्ल्यात आम आदमी पार्टीने म्हणजेच ‘आप’ने प्रचाराला वेग दिल्यानंतर भाजपा आणि आप यांच्यामध्ये राजकीय संघर्षही तीव्र झाला आहे. अशातच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना ‘आप’साठी काम करण्याचं आवाहन केलं आहे. राहा भाजपामध्येच काम ‘आप’साठी करा, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

केजरीवाल यांनी आज राजकोटमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गुजरातमधील भाजपा कार्यकर्त्यांना हे आगळं-वेगळं आवाहन केलं. “आम्हाला भाजपाचे नेते नकोत. त्यांनी ते त्यांच्या जवळ ठेवावेत. आम्हा भाजपाचे जेवढे पन्नाप्रमुख आहेत, कार्यकर्ते आहेत, गावागावांमधील, तालुक्यांमधील आणि मतदान केंद्रांवरील भाजपा समर्थक आमच्याशी जोडले जात आहेत. यामध्ये अनेक लोक फार चांगले आहेत. त्यांना मी आवाहन करतो. तुम्ही एवढ्या वर्ष भाजपाची सेवा केली, तुम्हाला काय मिळालं?तुमच्या मुलांना शाळा दिल्या यांनी? तुमच्यासाठी रुग्णालये बांधली का? तुमच्या घरामध्ये कोणी आजारी पडलं तर उपाचारांसाठी जमीन किंवा दागिने गहाण टाकावे लागतात की नाही? तुम्हालाही विजेची मोठी बिलं द्यावी लागतात की नाही भाजपावाले असले तरी?” असे प्रश्न केजरीवाल यांनी मतदारांना विचारले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *