स्त्रीलंपट देशाची शान काय वाढवणार? मोहम्मद शमीच्या पत्नीची टीका; हार्दिक पंड्याचा फोटो शेअर करत म्हणाली…

Trending NEWS

IND vs PAK: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वाद कित्येकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. अलीकडेच पुन्हा एकदा हसीन जहाँ हिने नाव न घेताच मोहम्मद शमीवर पुन्हा एकदा कटू टीका केली आहे. यावेळेस तर शमीला थेट स्त्रीलंपट म्हणत तिने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आहे. हसीन जहाँने हार्दिक पंड्याचा भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील फोटो शेअर करून एक अभिनंदनाची पोस्ट केली आहे. यातही शमीला घरचा आहेर द्यायला हसीन जहाँ विसरलेली नाही.हसीन जहाँने हार्दिक पंड्याचा फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, ‘अभिनंदन, शानदार विजय. देशाला विजय मिळवून देणाऱ्या आमच्या सिंहांचे खूप खूप आभार. देशाचा दर्जा, देशाची प्रतिष्ठा, इमानदार आणि देशभक्तांपासूनच टिकून राहते, गुन्हेगार आणि स्त्रीलंपटांमुळे नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा पाच विकेट्स राखत विजय झाला होता त्यावेळचा पंड्याचा फोटो शेअर करत हसीना जहाँन ही खास पोस्ट केली आहे. आज भारत विरुद्ध पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने येत असताना ही पोस्ट चर्चेत आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *