जनावरांचे लसीकरण पुर्ण करण्यावर भर

अकोला


३९ गावात काही जनावरांना झाली लागण
पशुसंवर्धन विभागाने सुरु केले लसीकरण

अकोला जिल्यातील ३९ गावांमधील ४७१ जनावरांना लम्पि आजाराची लागण झाली असून त्या करीता ३५ हजार ५०४ जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी दिली.

अकोला जिल्ह्यात ३९ गावांमध्ये ४७१ जनावरांना ‘लम्पि स्किन डिसीज’ या संसर्गजन्य आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या करिता जिल्हा पशुसंवर्धन यंत्रणा सज्ज असून प्रभावित क्षेत्रातील जनावरांचे लसीकरण युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. आतापर्यंत प्रभावित क्षेत्रातील ३५ हजार ५०४ जनावरांना लसीकर करण्यात आले असून ५१ हजार लसीकर अध्याप बाकी आहे, येणा?्या काळात सदर लसीकरण लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे, आज परेंत जिल्यातील ३३३ जनावरांची उपचार घेऊन लम्पि आजार पासून मुक्तता झाली असून उर्वरित १३८ जनावरांची प्रकृती मध्ये लवकरच सुधारणा होणार आहे, संपूर्ण जिल्याचे विचार केला तर आतापर्यंत कोणत्याही जनावरांचा लम्पि आजार मुळे मृत्यू झाला नसल्याची माहिती या वेळी पशुसंवर्धन विभागाने दिली आहे, सदर लम्पि आजार बाबत शेतकNयांनी आपल्या जनावरांची काळजी कशा प्रकारे घ्यावी या बाबत पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ तुषार बावणे यांना दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *