नवीन भाविक सदस्यांना गणपती बाप्पाची प्रतिमा भेट

अकोला

मुर्तीजापुर  :  मुर्तीजापुर शहरातील स्टेशन परिसरात असलेल्या न्यू गणेश मंडळ च्या वतीने नवीन भाविक सदस्यांना गणपती बाप्पाची प्रतिमा भेट देण्यात आली. शहरातील न्यू गणेश मंडळ हे 50 व्या वर्षात पदार्पण करत आहे या गणेश मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक धार्मिक कार्यक्रम राबविले जात आहे समाजामध्ये एकोपा एकता टिकवण्यासाठी या मंडळाचे माध्यमातून विविध धार्मिक सामाजिक कार्य केल्या जात आहे.  न्यू गणेश मंडळाचे अध्यक्ष अमित नागवान व उपाध्यक्ष अंकित अग्रवाल यांच्या उपस्थितीत मंडळाशी जुळलेले नवीन भाविकांना श्री ची प्रतिमा भेट देण्यात आली कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष मोनाली ताई कमलाकर गावंडे सौ सुमन अंकित अग्रवाल सुनील अग्रवाल लालू अग्रवाल चिंटू अग्रवाल अश्विन अग्रवाल कमलाकर गावंडे व इतर अनेक कार्यकर्ते जुने पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *