श्री विठ्ठलासह भक्तांच्या भेटीला निघाली श्रीं ची पालखी

अकोला ताज्या घड्यामोडी


मुर्तीची विधिवत पुजा

शेगांव
आज सकाळी श्री संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूर येथे श्री विठ्ठलाबरोबर भक्तांच्या भेटीसाठी निघाली. दोन वर्ष कोरोना संकटानंतर पालखीला परवानगी मिळाली आहे. कोरोना संकटानंतर भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे. आज पहाटे हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रींच्या मुर्तिची विधिवत पुजा , आरती झाली. त्यानंतर सकाळी पालखी शेगाव येथील मंदिरातून निघाली.
शेगांव येथील श्री गजानन महाराज संस्थानची ‘श्रीं’ची पालखी पंढरपूर वारीकरिता भजनी दिंडी, गज व अश्वासह ६ जूनला सकाळी ७ वाजता निघाली. ही पालखी ८ व ९ जून रोजी अकोल्यात मुक्काम करणार असल्यामुळे अकोलेकरांना माउलीच्या पालखीची ओढ लागली आहे. तर शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे यंदा पालखीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
कोरोनामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर अकोल्यात पुन्हा ‘श्रीं’च्या पालखीचा भव्य सोहळा पहावयास मिळणार आहे. त्यामुळे पालखीच्या स्वागतासाठी शहरात जय्यत तयारी सुरू आहे. तर रस्त्यांच्या बांधकामांमुळे यंदा पालखीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी प्रशासनाकडून हा मार्ग जाहीर करण्यात आला. दरम्यानच्या काळात या पालखी मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळवली जाणार आहे. ७ जून रोजी गायगाव येथे आगमन व भौरद येथे मुक्काम, ८ जून रोजी अकोला येथे आगमन व मुंगीलाल बजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात मुक्काम, ९ जून रोजी जुने शहरातील जि.प. शाळेत मुक्काम, १० जून भरतपूर, वाडेगाव येथील मुक्कामानंतर पुढे मार्गस्थ होईल. मुंगीलाल बजोरिया विद्यालयासमोरून पालखी मार्गस्थ होत पोस्ट ऑफीस, धिंग्रा चौक, टॉवर चौक, रतनलाल प्लॉट चौक, नेहरू पार्क चौक, हुतात्मा चौक, इन्कमटॅक्स चौक, हिंदू ज्ञानपीठ विद्यालय, आदर्श कॉलनी, बोबडे दूध डेअरी, सिंधी कॅम्प, जेल चौक, अशोक वाटिका, सरकारी बगीचा, सिटी कोतवाली चौक, जयहिंद चौक, हरिहर पेठ, शिवाजी हाऊन हायस्कूलपर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. पालखीचा बुधवारचा मार्ग असा राहणार आहे.भौरद येथून पालखी बुधवारी ८ जूनला अकोला येथे दाखल होईल. खंडेलवाल विद्यालय, गोडबोले प्लॉट, गजानन चौक, श्रीवास्तव चौक, विठ्ठल मंदिर, काळा मारोती, लोखंडी पूल, मोठे राम मंदिर, सावतराम मिल समोरून मंगलदार मार्केट, अकोला स्टॅन्ड, संतोषी माता मंदिर, दामले चौक, जुना वाशीम स्टॅन्ड, चांदेकर चौक, कालंका माता मंदिर, स्वावलंबी विद्यालय समोरून मुंगीलाल बजोरीया विद्यालय येथे मुक्काम थांबेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *