
बार्शीटाकळी : गुरूवार रोजी बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बार्शीटाकळी येथे 49वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले ,कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गजेन्द्र काळे उदघाटक पंचायत समिती बार्शीटाकळी गटशिक्षणाधिकारी श्री रतनसिंग पवार साहेब व प्रमुख पाहूणे म्हणून अकोला जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष श्री रवींद्र भास्कर, पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री देशमुख सर,श्री वानखडे सर , जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे सदस्य श्री दिपक गोल्डे ,विश्वास जढाळ , व बार्शीटाकळी तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रभू चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते ,या प्रसंगी उदघाटक म्हणून लाभलेले पवार साहेब यांनी प्रत्येक विज्ञान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उपक्रमशील व नव निर्माण क्षमता कशी विकसित होईल या कडे लक्षे देने आवश्यक आहे,अध्यक्षीय भाषणात गजेंद्र काळे यांनी साहेबांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या पूर्ण करण्याचा सर्व शिक्षक प्रयत्न करतील अशीअपेक्षा केली. या प्रसंगी तालुक्यातील विज्ञान शिक्षक श्री गजानन महल्ले व विज्ञान शिक्षिका सौ दुर्गा महल्ले सेवानिवृत्ती निमित्ताने शाल व श्री फळ देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाटक व तालुका विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रदर्शनी मध्ये माध्यमिक गटात 61 व प्राथमिक गटात 27 एकुण 88 प्रतिकृतीचा समावेश होता क्रार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबासाहेब धाबेकर विद्यालयातील शिक्षक श्री सैय्यद कमर ,नाशित अली,सौ पुजा धाबेकर,नितीन टापरे,अजय उकांडे, अब्दुल नईम, सय्यद शकील विज्ञान अध्यापक मंडळाचे श्री पांडे सर ,देशमुख सर, मिलिंद सुपासे,प्रज्ञा जामनीक,सौ . शुभांगी देशमुख चंदनशिव मॅडम यांचे सहकार्य लाभले परिक्षक म्हणून श्री खंडारे सर ,खांबलकर सर ,मार्कंडे सर,दाभाडे सर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन राहुल खांबलकर तर आभार प्रदर्शन साहेबराव शिंदे यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरता बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बार्शीटाकळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले