औरंगाबादची फेमस युट्यूबर बिंदास काव्या बेपत्ता प्रकरणाला नवे वळण, अखेर पोलिसांनी काढले शोधून!

Entertainment


औरंगाबाद, 10 सप्टेंबर : औरंगाबादमधील फेमस युट्युबर गर्ल बिंदास काव्या (YouTuber Bindas Kavya)शुक्रवारपासून बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. अखेर औरंगाबाद पोलिसांनी प्रयत्नाची पराकाष्टा करत बिंदास काव्याला शोधून काढले आहे. रागाच्या बरात काव्या मध्य प्रदेशला निघून गेली होती.औरंगाबाद येथील एक प्रसिद्ध अल्पवयीन युट्यूबर बिंदास काव्या शुक्रवारी घरातून निघून गेली होती. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. बिंदास काव्या ही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी 363 नुसार गुन्हा दाखल केला, अखेर पोलिसांनी काव्याचा शोध लावला आहे. मध्य प्रदेशातील इटारसी ते भोपाळ रेल्वे स्थानकादरम्यान RPF पोलिसांनी काव्याला शोधून काढले आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे औरंगाबाद पोलिसांच्या मेहनतीला यश मिळाले आहे. शुक्रवारी दुपारी रागाच्या भरात काव्या घरातून निघून गेली होती.विशेष म्हणजे ही अल्पवयीन मुलगी युट्यूबवर प्रसिद्ध असून, तिचे युट्यूबवर 4.32 मिलियन सबक्रायबर आहेत. शुक्रवरी अभ्यासाच्या कारणावरून तिचे आणि आई वडिलांचे भांडण झाले होते. आई-वडिलांनी तिचा मोबाईल घेतल्याने ती रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी छावणी पोलीस अधिक तपास करत आहेत. कमी वयात काव्याने youtube वर यशस्वी भरारी घेतली आहे.
याबाबत या मुलीच्या आईने एक 19 मिनिटाचा व्हिडीओ प्रसिद्ध केला असून, ज्यात आमची मुलगी कधीही एकटी राहत नाही. एवढ्या वेळ ती एकटी राहू शकत नाही. त्यामुळे तिला कुठेही पाहिले तर आम्हाला माहिती कळवा असे आवाहन केले आहे. सोबतचा आम्हाला कुणीही मदत करत नसल्याचा आरोपही मुलीच्या आईने केला होता. पण, आता औरंगाबाद पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये काव्याला शोधून काढले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *