विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या १८ पैकी १४ मंत्र्यांनी अद्यापही आपल्या खात्याचा कार्यभार स्वीकारलेला नाही या मुद्द्यावरून जोरदार टीकास्त्र डागलं आहे. “नेमलेल्या १८ पैकी १४ मंत्र्यांनी अजून कार्यभार स्वीकारलेला नाही आणि मंत्रालयात लोकांची कामे खोळंबली आहेत,” असा आरोप अजित पवारांनी केला. तसेच मुख्यमंत्री प्रशासकीय कामे सोडून घरोघरी फिरतायत, असा टोला लगावला. ते आज (१२ सप्टेंबर) विधानभवनातील वार्ताहर कक्षात आयोजित विशेष पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “राज्यातील विद्यमान सरकारला अडीच महिने होत आले तरी, मंत्रीमंडळाचा पूर्ण विस्तार झालेला नाही. जिल्ह्यांना पालकमंत्री नेमलेले नाहीत. नेमलेल्या १८ पैकी १४ मंत्र्यांनी अजून कार्यभार स्वीकारलेला नाही. मंत्रालयात लोकांची कामे खोळंबली आहेत. मंत्र्यांच्या कार्यालयात फाईलींचा डोंगर साठला आहे. मुख्यमंत्री प्रशासकीय कामे सोडून घरोघरी फिरतायत. राजकीय सभा घेतायत.”
OMG! वाऱ्याच्या वेगाने पाण्यावर पळताना दिसले हरीण;व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का