विकासकाकडून शेतकऱ्याची तीन कोटींची फसवणूक; हिंजवडीत तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

Maharashtra State

पिंपरी : जमीन व्यवहारातील ठरलेली तीन कोटी १० लाख रूपयांची रक्कम न देता विकसकाने फसवणूक केल्याची तक्रार नेरे येथील शेतकऱ्याने हिंजवडी पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांताराम दत्तात्रय कुदळे (वय-६१, व्यवसाय-शेती, रा. गणेशनगर, नेरे) यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी साईरंग डेव्हलपर्सचे मालक के. आर. मलिक, मोहम्मह बीन शाहरूख व मलिक यांचा मुलगा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *