अकोला : जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून लॅम्पची जनावरांमध्ये लागणं झाल्याने मळसूर ग्रामपंचायत येथे जनावरांना लंपी स्किन आजाराने लसीकरण सुरूकरण्यात आले या वेळी काही गुरे लंपी स्किन आजाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे पशु पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले, त्यातच लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण अर्धवट झाल्याने गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील काही भागात लंबस्किन आजाराने ग्रस्त जनावरे निदर्शनास येत आहे त्यामध्ये आता महसूल येथे या आजाराचा शिरकाव झाला असून पशुपालकांची चिंता वाढली आहे. मात्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना कोणतीच माहिती प्राप्त नाही व ते गावांमध्ये येत नसल्याने पशुपालकांनी रोष व्यक्त केला त्या मुळे पशुपालकांनी खाजगी डॉक्टर कडून विविध आजाराचे निदान करून घेतले तरीही पशुवैद्यकीय अधिकारी किंवा डॉक्टर गावात फिरवून सुद्धा पाहत नाही मळसूर येथे जवळपास दीड हजार पशुधन असून सुद्धा दुर्लक्ष केले जात आहे. या प्रकाराकडे वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी लक्ष देऊन लस उपलब्ध करून द्यावी व गावात पशुवैद्यकीय डॉक्टरांची सेवा द्यावी अशी मागणी पशुपालक करीत आहे