नदीच्या पाण्यामधुन चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शालेय जीवघेणा प्रवास

अकोला

– बोर्डी नदीवर पूल नसल्यामुळे गावाचा संपर्क तुटला

– शिवाजीनगर मधील नागरिकांचे होत आहेत नाहक हाल बेहाल

अकोट  :  अकोला जिल्ह्यामधील अकोट तालुक्यामधील वडाळी देशमुख हे गाव राजकीय दृष्ट्या बहुचर्चित असून विकासाच्या दृष्टीने मात्र जैसे थेच आहे यामध्ये कुठली सुधारणा नसल्यामुळे येथील छत्रपती शिवाजीनगर हे छोटसं गाव बोर्डी नदीच्या तीरावर वसलेले असून संपूर्ण मजूर वर्गाचा संपर्क गावापासून तुटलेला आहे  गेल्या कित्येक वर्षापासून या वस्तीमधील नागरिकांची कुठल्याच प्रकारची सोय सुविधा उपलब्ध नसून त्यांना आज रोजी दैनंदिन जीवनासाठी लागणारे दळण किराणा वगैरे साहित्य हे कुठून आणावं फार मोठा पेच निर्माण असून जीवन कसे जगावे हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे डोलवत आहे तरीही एवढ्या मोठ्या पुरा मधून नागरिक दळण किराणाला गावामध् मोठ्या पुरा मधून जीव धोक्यात टाकून गावामध्ये येत आहेत,  लहान लहान चिमुकल्या विद्यार्थी हे गावांमध्ये शाळेमध्ये शिक्षण शिकण्याकरता त्यांचा जीव धोक्यात टाकून प्रवास मोठ्या पुरा मधून करताना आज रोजी दिसत आहे ही अत्यंत दयनीय बाब असून या बाबीवर आजपर्यंत कुठल्याच स्थानिक राजकारणी पुढाऱ्यांनी आमदार, जिल्हा परिषद ,तसेच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने माध्यमातून कुठल्याच प्रकारचा निधी व छोटे खाणी पूल त्या ठिकाणी आजपर्यंत बांधण्यात आलेला नाही त्यामुळे येथील शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण घेण्याचे दिवस असून यावेळी त्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे तरी या मतदार करणाऱ्या नागरिकांना या होणाऱ्या दुर्घटनेतून बाहेर पडण्यासाठी या नदीवर छोटा पूल बांधण्यात यावा अशी संपूर्ण छत्रपती शिवाजीनगर मधील नागरिकांची गेल्या कित्येक वर्षापासून ओरड आहे संबंधित विभागाने त्यांना न्याय द्यावा अशी त्यांची मागणी जोर धरत आहे,
प्रकाश काळे शिवाजीनगर मधील नागरिक
गेल्या काही वर्षापासून आम्हाला जाण्या येण्याकरिता फुल नसल्यामुळे आमचे जनजीवन विस्कळीत झाले असून चिमुकल्या विद्यार्थ्यांना या पुरा मधून जीवघेणा शालेय प्रवास करत आहेत यावेळी कुठलीही दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण राहील

राजकुमार खोबरखेडे नागरिक
शिवाजीनगर मधील समस्त नागरिकांना कुठल्याच प्रकारची शासनाची आजपर्यंत सोयी सुविधा ना कुठलाच लोकप्रतिनिधी आमच्याकडे आजपर्यंत फिरकला नाही मतदानाच्या वेळी फक्त आम्हाला विचारतात बोर्डी नदी वरती पूल निधी उपलब्ध करून द्यावा,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *