– एम पी जे च्या वतीने तहसीलदाराला निवेदन
मुर्तीजापुर : मुर्तीजापुर तालुक्यातील शेतकऱ्यांना शिधापत्रिका द्वारा गव्हाचे वाटप पूर्ववत करा अशी मागणी मोमेंट फॉर पीस अँड जस्टीस फॉर वेल्फेअर या संघटनेचे वतीने तहसीलदार कडे निवेदन द्वारा करण्यात आली आहे. एपीएल रेशन कार्डधारकांना शेतकरी शासनाकडून सवलतीच्या दरात मिळणाऱ्या गव्हापासून वंचित आहेत शेतकरी हा जगाचा पोशिंदा असल्याने त्यांना तातडीने धान्य उपलब्ध करून देण्याची मागणी रेटून धरून निवेदन सादर करण्यात आले आहे सत्ताधार पाऊस आणि पूर यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आता नुकतेच नुकसान झालेले आहे पेरणी सुद्धा शेतकऱ्यांना कर्ज घेऊन केलेली आहे असे अनेक संकट शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर आहे तरी अशा परिस्थितीत शासनाने गव्हाचा वाटप बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे कर्ज भरावे की पोट भरावे असाही प्रश्न समोर थाटत आहे एपीएल कार्ड शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या सवलती या धान्याच्या प्रतीक्षेत आहे केसरी रेशन कार्डधारकांना सवलती मध्ये मिळणारे धान्याचा वाटप सुरू ठेवण्याची मागणी एलपीजी तालुकाध्यक्ष युनूस खान , उबेद अहमद, कलीम खान ,इमरान खान, मोहम्मद उमर ,निसार राही ,जावेद अहमद ,शेख जुबेर कुली व इतर कार्यकर्ता उपस्थित होते निवेदनाची प्रतिलिपी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सुद्धा सादर करण्यात आली आहे