लालपरीचं ठरतेय जीवघेणी ; एसटी बसच्या बाहेर आलेल्या पत्र्यामुळे दोन जणांचे हात तुटून वेगळे

वाशिम

सुस्त आगर व्यवस्थापकाची सुस्त कामगिरीमुळे घडला अपघात

 – एक शेतकरी आणि एका युवकाचा समावेश
बुलडाणा :  16 सप्टेंबर  एसटी बसच्या बाहेर आलेल्या पत्र्याने रस्त्यावरून चालणाऱ्या शेतकऱ्याचा हात दंडापासून वेगळा केला. एक युवकही या पत्र्यामुळे आपला हात गमावून बसला आहे. मलकापूरवरून पिंपळगाव देवीकडे जाणाऱ्या या बसने आज सकाळी 7 वाजता आव्हा गावाजवळ तीन जणांना गंभीर जखमी केले. ज्या शेतकऱ्याचा हात तुटून वेगळा झाला तो 45 वर्षीय शेतकरी असून त्याचे नाव परमेश्वर सुरडकर आहे. त्यांना तातडीने मलकापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. तर या बसच्या पत्र्याने पोलीस भरतीची प्रॅक्टिस करणाऱ्या एका युवकाचाही हात तुटून वेगळा झाला तर दुसरा युवक हा जखमी झाला आहे. त्यात विकास गजानन पांडे (22 वर्ष) याचा समावेश आहे. त्याचा हात कटून वेगळा झाला आहे. विकास हा अग्निवीर भरतीची प्रॅक्टिस करत होता. सदर बस (एम एच 40 एन 9121) ही मलकापूर डेपोची आहे. तिचा चालक देवराव भावराव सूर्यवंशी आहे.  दरम्यान अपघातानंतर संतप्त जमावाने मलकापूर डेपोत तोडफोड केल्याचे समजते. पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. शेतकरी आणि युवक दोघांची प्रकृती गंभीर चिंताजनक असल्याची माहिती आहे या अपघाताचा गुन्हा धामणगाव पोलीस ठाण्यात नोंद करणे सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *