– लायन्स क्लब ऑफ अकोला मिडटाऊनने मातोश्री वृद्धाश्रमात केली भोजन व्यवस्था
अकोला- वृद्धाश्रम ही संकल्पना भारतीय संस्कृतीत नाही. मात्र आधुनिक व पाश्चात्य परंपरेच्या नांदी लागून युवा पिढी वृद्ध आई-वडिलांची रवानगी वृद्धाश्रमात करीत आहे. अगदी शासकीय नोकरी करणारी युवा पिढी ही या दृष्ट चक्राच्या नादी लागली आहे. वास्तविक माता-पित्यांचे उपकार हे अनंत आहेत ते न फिटणारे आहेत. त्यांचे ऋण कोणीही फेडू शकत नाही. म्हणून युवा पिढीने शिक्षण,संस्कृती व संस्कार याची जीवनाशी मोट बांधून आपल्या वृद्ध माता-पित्यांचा आदर करून त्यांना सन्मानाने जगू देण्याचे आवाहन मातोश्री वृद्धाश्रमाचे संचालक संग्राम गावंडे यांनी केले. शिवापुर फाटा लगत असणाऱ्या मातोश्री वृद्धाश्रमात गत 26 वर्षापासून सेवा कार्य करणाऱ्या लायन्स क्लब ऑफ अकोला मिडटाऊनच्या वतीने वृद्धाश्रमात राहणाऱ्या निराधार वृद्धजनाना भोजनदानाचा उपक्रम प्रारंभ करण्यात आला.क्लबच्या वतीने नित्य सकाळी अल्पोपहार व दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येते .या उपक्रम प्रारंभ सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानावरून संग्राम गावंडे बोलत होते. यावेळी लायन्स क्लब मिडटाऊनचे डिस्ट्रिक्ट पीआरओ मुरलीधर उपाध्याय,झोन चेअर पर्सन मुकेश शर्मा,क्लबचे अध्यक्ष प्रा.विवेक गावंडे,सचिव नितीनकुमार जोशी,कोषाध्यक्ष जितेंद्र जैन,संतोष उपाध्याय, संतोष अग्रवाल,लोकेश चंद्रशेखर भाला,रूपल चंद्रशेखर भाला,पंकज राजकुमार शर्मा,राम खूबचंद राठी,लखन खुबचंद राठी, महेंद्र खेतान,राजेश पूर्वे, सुशील अग्रवाल,सुनील तळमळे,मंगेश कक्कड,स्वप्निल पंचगडे,मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापकीय संचालक युवराज गावंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.यावेळी या स्थायी भोजनदान उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख चंद्रशेखर भाला, मुरलीधर उपाध्याय,मुकेश शर्मा, संतोष वाधवानी, किशोर अग्रवाल, राजकुमार शर्मा, खूबचंद राठी आदी प्रकल्प प्रमुखांचा स्मृतीचिन्ह,शाल,श्रीफळ देऊन भावपूर्ण गौरव करण्यात आला.या दैनिक भोजनदानाचा मान्यवरांच्या उपस्थितीत महिला पुरुष वृद्धजनाना भोजनदान करून प्रारंभ करण्यात आला. यावेळी क्लबच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमास दोन व्हीलचेअर व एक वॉकर भेट देण्यात आली. प्रास्ताविक क्लबचे मुकेश शर्मा यांनी केले. तर मनोगत मुरलीधर उपाध्याय यांनी व्यक्त करून या अभिनव उपक्रमाची माहिती दिली. लायन्स क्लब मिडटाऊनचा हा तिसरा उपक्रम असून अशा प्रकारचे दोन अन्नछत्राचे उपक्रम स्थानीय तुकाराम कर्करोग रुग्णालयात सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी क्लब सदस्य राजेश पूर्वे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत क्लबच्या सेवाभावी उपक्रमाची माहिती दिली.तर संतोष अग्रवाल यांनी मातेवर गीत सादर करीत क्लबच्या संगीत चमूच्या वतीने दर महिन्याला या वृद्धाश्रमात भक्ती गीते सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.कार्यक्रमात मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापकीय संचालक युवराज गावंडे यांनी सपत्नीक क्लब मध्ये प्रवेश घेतला. यावेळी उपाध्याय यांनी त्यांना क्लबची पिन बहाल करीत त्यांचे स्वागत केले.तसेच पंकज शर्मा यांनीही क्लब मध्ये यावेळी प्रवेश घेतला.यावेळी युवराज गावंडे यांनी मातोश्री वृद्धाश्रमाच्या आधुनिक नूतनीकरणाची माहिती देत वृद्धाश्रम हे चकचकीत करून आधुनिक पद्धतीने बांधकाम करण्यात आले असून वृद्धजनांसाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी व अन्य वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.क्लबच्या वतीने यावेळी संग्राम गावंडे व युवराज गावंडे यांचा सत्कार करण्यात आला,तर मातोश्री वृद्धाश्रमाच्या वतीने क्लब अध्यक्ष प्रा. विवेक गावंडे यांचे स्वागत करण्यात आले.संचालन व आभार क्लब अध्यक्ष प्रा विवेक गावंडे यांनी केले.यावेळी क्लब पदाधिकारी,वृद्धाश्रमाचे कर्मचारी व वृद्धजन आदी उपस्थित होते.