अकोला : येथील ठोक भाजी बाजारात बाहेरून येणाऱ्या मालाची आवक मोठी आहे. मात्र, भाज्यांची आवक कमी झाली. बाजारात नियमित येणाऱ्या मालाच्या तुलनेत निम्माच माल उतरवला जात आहे. यामुळे किरकोळ विक्रेत्यांना भाज्यांचा तुटवडा जाणवतो. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. स्थानिक भागातूनही शहरात शेतकरी माल पोहोचवतात. पण सध्या त्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे भाज्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. महागाईची झळ सोसत असलेल्या नागरिकांना आणखी एक फटका बसला आहे. ऐन सणासुदीच्या काळात भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत भाज्यांचे दर जवळपास दुपटीने वाढले आहे. येत्या काळात भाज्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाज्यांसाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. पालेभाज्यांचे दर दुप्पट ठोक भाजी बाजारातील दरानुसार, पालक, मेथी, कोंथिबीर यांचे दर गेल्या आठवड्यात ६० ते ८० रुपयांपर्यंत होते. मात्र हे दर वाढून आता १५०-२०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.