जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेचे आयोजन आज करण्यात आले होते .या सभेत अनेक ग्रामीण विकास कामाचा मुद्दा तसेच सदस्या च्या निधी समान वितरण संदर्भात अधिकाऱ्याला धारेवर घेतले .
जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेत आज अनेक विषयावर चर्चा करण्यात आली .या सर्व साधारण सभेत आज सर्व सदस्या मार्फत ग्रामीण भागातील कामकाजाच्या विषयावर किरकोळ वाद घडवला आहे .
15 वित्त आयोगाचा निधी संदर्भात अधिकाऱ्यांचे अनियोजन तसेच कामे परिपूर्ण होत नसल्याचे आरोप सदस्या मार्फत करण्यात आले आहे .या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेच्या शिकस्त शाळा पाडण्याच्या विषयावर चांगलेच चर्चेला उधाण आले होते .शिकस्त शाळा पाडण्याचे सर्व निर्णय शिक्षणअधिकारी देण्यात यावा तसेच शिकस्त शाळा जरी पाडल्या तर लवकरात लवकर नवीन वर्ग खोल्या बांधण्यात यावा अशे सभेत काही सदस्यांच्या मार्फत बोलल्या गेलेआहे .
शिकस्त शाळा तर पडल्या जातात पण त्यांच्या जागी नवीन शाळा चे बांधकाम वर्षानुवर्षे रखडलेली राहतात .
या वर सदस्यांनी अध्यक्ष यांना समस्या बाबत निवारण निर्णय घेण्याची विनंती सदस्या मार्फत करण्यात आली आहे .