वेदांत प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला वळवल्यामुळे शिंदे- फडणवीस सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे बस स्थानक चौकात आंदोलन…!

अकोला

महाराष्ट्रात येऊ घातलेल्या वेदांत प्रकल्प हा दोन लाख कोटी रु चा येणारं होता.परंतु शिंदे फडणवीस सरकार ने सदर प्रकल्प हा महाराष्ट्रातून गुजरात कडे वळवला आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अकोला बस स्थानक चौकात आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात येऊ घातलेला वेदांत हा दोन लाख कोटी रुपये भांडवली गुंतवणूक करणारा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अकोला महानगरच्या वतीने सोमवारी 19 सप्टेंबर रोजी शहरातील मदनलाल धिंगा चौका सह इतर महाविद्यालयाच्या ठिकाणी न विद्यार्थी शहराध्यक्ष अर्जुन लोणारे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, अमरावती विभागीय अध्यक्ष अविनाश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस आकात झांबरे उपस्थित होते. दीड लाख युवकांना रोजगार या प्रकल्पाच्या माध्यमातून निर्माण होणार होता परंतु या सरकारच्या नाकर्ते पणामुळे आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे युवकांच्या हातचा रोजगार निघून गेला. त्यामुळे शिंदे फडवणी सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या विद्यार्थ्यांनी आज बस स्थानक चौकात निदर्शने आंदोलन केले. यावेळी शेकडो विद्यार्थी आंदोलनात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *