निंबी चलका गावात वीज पुरवठा खंडित

अकोला

बार्शीटाकळी :  बार्शीटाकळी तालुक्यातील निंबी चलका सेवा नगर या गावातील वीज पुरवठा वारंवार बंद राहत आहे याबाबत गावाचे लाईनमन यांच्यासोबत संपर्क केला असता त्यांना जनतेच्या दुःखाची व समस्या ची काही देणे घेणे नाही असे वक्तव्य करण्यात येत असल्याचे बोलले, याबाबत गावकऱ्यांनी बार्शीटाकळी पंचायत समितीचे माजी सभापती महादेवराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत प्रशासनाने कार्यकारी अभियंता यांच्याकडे गंभीर स्वरूपाची तक्रार केली आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील ढाबा विद्युत वितरण कंपनी अंतर्गत निंबीचलका सेवा नगर या गावातील वीज पुरवठा वारंवार बंद राहत आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने विविध समस्या निर्माण झाल्यास वीज प्रवाह बंद असल्याने मच्छरांचा त्रास वाढला असल्याने आजार वाढले आहेत शाळेतील विद्यार्थ्यांचा अभ्यास बंद झाला आहे गावातील टीव्ही बंद असल्याने मनोरंजन बंद झाले मोबाईल चार्जिंग सेवा विस्कटलेली आहे चोरांच्या संख्या त वाढ होत आहे रात्रीच्या वेळी उघड्यावर साफ फिरत आहेत तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील पाणीपुरवठा बंद झाला गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे वीज बंद आहे मात्र बिल वसूल करणे सुरू आहे या गावातील लाईनमन नेमाडे यांना याबाबत कल्पना दिली असता त्यांना जनतेच्या समस्याची व दुःखाची काहीच घेणेदेणे नाही तसेच ते फोन सुद्धा उचलत नाहीत त्यामुळे गावकरी विद्युत वितरण कंपनीला कंटाळले आहेत ग्रामपंचायत प्रशासनाने माजी सभापती व विद्यमान उपसरपंच महादेवराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच वर्षाताई जाधव ग्रामपंचायत सदस्य यांनी दिनांक 12 सप्टेंबर 2022 ला कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अकोला यांच्याकडे याबाबत ग्रामपंचायत ठरावासह तक्रार केली आहे गाव अंधारात असल्याने विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे जनता परेशान आहे कार्यकारी अभियंता याबाबत काय निर्णय घेतात याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे तर दुसरीकडे गावकऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीच्या जिल्हा कार्यालयात मोर्चा काढण्यासाठी सभा घेतल्याची माहिती सूत्राकडून समोर आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *