मंगरूळपीर : यशवंतराव चव्हाण काला व विज्ञान महाविद्यालय मंगरूळपीर येथे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धतीवर १७ सप्टेंबर रोजी एक दिवसीय कार्यशाळा’ संपन्न झाली. यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी राज्यपाल कोश्यारी,उच्च शिक्षण मंत्री पाटील,प्रधान सचिव रस्तोगी कुलगुरू प्रा.डॉ दिलीप मालखेडे यांनी आभासी पद्धतीने मार्गदर्शन केले. संथेचे कोषाध्यक्ष दिलीप ठाकरे यांनी केले. यावेळी हरीष बाहेती, प्रा.अरुण इंगळे, प्रा.डॉ.कान्हेरकर, डॉ.गुल्हाणे, डॉ.गावंडे, डॉ.करांगडे, डॉ.चव्हाण, प्रा.झिमटे सर, अमरावती विद्यापीठाचे तज्ञ मार्गदर्शक प्रा.डॉ.महेश डाबरे उपस्थित होते.
उद्घघाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ.कान्हेरकर यांनी नवीन शिक्षण धोरण व त्याची उपयुक्तता तसेच २१ व्या शतकातील बदलते शैक्षणिक धोरण यांची सांगड घालत आपल्या विद्यार्थांना पसंती क्रमानुसार आधारित श्रेयांक पद्धतीने शिकण्याची संधी उपलब्ध झाली आहे.त्यामुळे तिचे महत्व व आवश्यकता कशी आवश्यक आहे ते पटवून दिले.प्रा.डॉ.महेश डाबरे यांनी आपल्या प्रशिक्षण सत्रामधून पसंतीक्रमावर आधारित श्रेयांक पद्धती म्हणजे काय? ती आज का आवश्यक आहे. पसंतीनुसार जर विध्यार्थांना आवडीचा विषय घेऊन शिकता आले ते कौशल्ल्ये आत्मसात करता येतील.त्यावर आधारित क्रेडीट गुण मिळवून आपले शैक्षणिक दर्जा वाढविता येईल.ग्लोबल पातळीवर लोकल राहून जाता येईल.नवीन शैक्षणिक धोरणातील मुख्य वैशिष्ठे म्हणजे स्वयंम पातळीवर उद्योग वाढविता येईल.नोकरी न करता नोक-या देणा-याच्या श्रेणीत जाता येईल.त्यासाठी हा बदल करणे अनिवार्य आहे.
अमरावती विद्यापीठाने राज्यात सर्वात प्रथम नवीन शिक्षण धोरणाची शिकविण्यास सुरवात केली आहे.त्यानुसार सर्व अभ्यास्क्रमची पुनर्रचना करून विद्यार्थांना नवीन दालन उपलब्ध करून दिले आहे.हेच काळाचे आव्हान स्वीकारून सर्व प्रथम शिक्षक यांनी जाग्रुत राहून आपल्या विद्यार्थांना पालकांना तसेच समाजाला समजावून सांगितले पाहिजे.यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. नवीन श्रेयांक शिक्षण पद्धतीवर आधारित विविध पैलू,घटक,तसेच त्यानुषंगाने आवश्यक बाबी यांची सखोल चर्चा कार्यशाळेमध्ये करण्यात आली. कार्यशाळेमध्ये एकूण सहा महाविद्यालयातील एकूण ६६ प्राद्यापकांनी सह्भाग घेतला. सूत्र संचालन डॉ.रासेकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. इंगळे सर यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राद्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.