अकोला येथील खेळाडुंना मिळाले  1 रौप्य, 2 कांस्य पदक

अकोला


अकोला : मध्य प्रदेश मधील देवास येथे दि.१०/९/२०२२ तेदि.११/९/२०२२ या कालावधीमध्ये पार परडलेल्या 3 री मिनी व सब ज्युनिअर वेस्ट झोन राष्ट्रीय रोलबॉल
स्पर्धे मध्ये अकोला येथील यंग विंगस रोलबॉल, स्केटींग ॲड फिटनेस क्ल्‍ब, अकोला चे खेळाडु १४ वर्षा आतील मुले गटात स्वराज बाहकर याने रौप्य पदक तर आयुष चेंडालणे याने कांस्य पदक पटकावीले तर सुरज गर्जे याने ११ वर्षा आतील मुले गटात  कांस्य पदक पटकावीले . या यशा बददल अकोला रोल बॉल असो. चे अध्यक्ष तथा साने गुरुजी विद्या मंदीर चे अध्यक्ष श्री दिलीपराव अंधारे सर, साने गुरूजी विद्या मंदीर चे प्राचार्य श्री संजय इंगळे सरतथा यंग विंगस रोलबॉल, स्केटींग ॲड फिटनेस क्ल्‍ब, अकोला चे अध्यक्ष श्री अशोक सिरसाठ यांचे हस्ते सत्कार करण्यांत आला. खेळाडु आपल्या यशाचे श्रेय आई वडील मुख्य प्रशिक्षक श्री अनिकेत सिरसाठ सर
सर यांना देत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *