– अतिवृष्टी नंतर शेतकऱ्यावर आणखी एक मोठे संकट
– शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी.
तेल्हारा : तालुका अंतर्गत येत असलेल्या हिवरखेड येथील एका शेतकऱ्याचा बैलं लम्पि आजाराने दगावल्याची घटना घडली, शेतकरी सोहेबअली मीरसाहेब या शेतकऱ्याच्या एका महागळ्या बैलाचा लम्पि आजरा मुळे मुत्यू झाला, तर त्याच दिवशी महागळी दुधाळ गायचा सुद्धा लम्पि आजाराने दगवल्याची घटना घडली असून बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. हिवरखेड मधील वार्ड क्र ३ येथील गणेश अढाऊ यांच्या मालकीची ही गाय असल्याचे समजते, लम्पि आजार हा तेल्हारा तालुक्यात वाऱ्यासारखा पसरत आहे, पशुसंवर्धन विभागाने तात्काळ लम्पि प्रतिबंधक लस देण्याची मागणी या भागातील शेतकरी करीत आहे तसेच जे गुरे लम्पि आजाराने दगावले आहेत अशा शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने नुकसान भरपाई ची मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केल्या जात आहे.