अँड मुक्तेश्वर तिरुख यांना ग्रामस्थाच्या वतीने श्रद्धांजली

अकोला

वाडेगांव- बाळापुर पातुर तालुका काँग्रेस पक्षाचे विधिज्ञ सेलचे अध्यक्ष अँड मुक्तेश्वर तिरुख यांचे ११ सप्टेबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना वाडेगाव वाशियाच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वाडेगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये आयोजित श्रध्दांजली सभेमध्ये समस्त गावकरी, विविध पक्ष, संघटना तसेच बार असोसिएशनच्या वतीने अँड  मुक्तेश्वर तिरुख यांना श्रंध्दाजली वाहण्यात आली तसेच यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ हिम्मतराव घाटोळ, प्रकाश कंडारकर, बहीणाबाई खोटरे विद्यालयाचे अध्यक्ष रमेश ठाकरे, तंटामुक्ती अध्यक्ष मोहम्मद अफतार, जि. प .सदस्य चंद्रशेखर चिंचोलकार,  अरुण काकड, मनोहर राहणे, शामलाल लोध, प्रमोद डोंगरे, डॉ वासुदेव फाळके,  राजु  शेंडे, गोपाल मानकर, विष्णु दांदळे, गणेश कंडारकर, अँड धम्मरत्न जंजाळ, अँड सुबोध डोंगरे, अँड सुभाष डोंगरे, यांनी अँड मुक्तेश्वर तिरुख यांच्या निधनामुळे झालेले दुःख शब्दांमध्ये सांगता येणार नाही. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी न भरुन निघणारी आहे. अश्या शब्दात शोक संवेदना व्यक्त केल्या. यावेळी श्रद्धांजली सभेमध्ये विलास मानकर, ग्रा प सदस्य शेख सलीम शेख रद्दुल्ला, मोहम्मद मुझाहीद, अय्याज साहील, डॉ राजेंद्र तिरुख, गजानन तायडे, नारायण मानकर, अरुण पळसकार, दिपक मसने, प्रशांत मानकर, पत्रकार संतोष काळे, डॉ . शेख चांद , विजय चिंचोलकार, गुलाम नुरभाई,अशोक घाटोळ,अरुण पोटदुखे, सचिन धनोकार,  , श्रीकृष्ण टाकळकर, वाय एस पठाण,बाबुराव फाटकर, सुधाकर भारसाकडे, अतुल राहुडकार, पियुष तिरुख, शैलेश भटकर, आदींची उपस्थिती होती यावेळी सभेचे संचालन सागर सरप यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *