रोग राई प्रसार वाढू नये त्यासाठी खड्डा करून धुजवत आहे
अकोट : वडाळीदे. परिसरामध्ये गेल्या महिन्यापासून लगातार धुवाधार पाऊस होत असून करायचे अतोनात नुकसान होत आहे तसेच संपूर्ण शेती पाण्यामध्ये बुडून पडलेली आहे शेती खरडून जात आहे पहिलेच शेतकरी अस्मानी संकटाने चिंताग्रस्त झालेला आहे त्यातच या लंम्प्पी आजाराचे थैमान पसरलेली असून पशुपालकांमध्ये पशुच्या मृत्युमुखी व आजाराने ग्रासलेल्या पशुपालकांच्या चितेत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत असून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सत्र चालूच असल्यामुळे पशुपालक खोल खड्डे करून खड्ड्यामध्ये त्या दगावलेल्या गुरांना भुजवण्याची पद्धत परिसरामध्ये पशुपालक करत आहे अत्यंत चिंताग्रस्त होऊन भीतीचे वातावरण वाढत आहे परिसरामध्ये असंख्य पशुपालकांमध्ये पशु दगावल्यांची संख्या असंख्य होत असून आजारी पशूंची संख्या वाढत्या प्रमाणात आहे यावेळी प्रशासनाच्या पशुसंवर्धन विभागाने पशुपालक शेतकऱ्यांना यावेळी लंम्पी आजारावर प्रतिबंधक उपाय योजना व औषध उपचार तसेच लसीचे ताबडतोब उपाययोजना करून देण्यात यावी यावेळी प्रशांत मनोहर काळे या अल्पभूधारक मजूराची गाय कारोड व श्रीकांत गावंडे रुईखेड यांचा बैल दगावला आहे अशा अनेक पशुकालन पशुपालकांची पशु लंबी आजाराने दगावत असल्याने परिवाराचा गाडा कसा चालावा अशा परिस्थितीमध्ये सर्वीकडून घाला होत असताना पशुपालन संपूर्णता तुटून गेलेला आहे यावेळी शासनाच्या मदतीची मागणी करत आहे
गावामध्ये शासनामार्फत वाढणाऱ्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाय घेण्याची गरज तयार झाली असून शासनाने व संबंधित विभागाने वडाळी गावामध्ये पुन्हा आजार लसीचे शिबिर औषध देण्यात यावे व मृत्युमुखी पडलेल्या पशूंचे शासनाने सर्व पंचनामे करून पशुपालकांना त्याचा मोबदला नुकसान भरपाई देण्याचे मागणी शेतकरी यावेळी करत आहेत ,