अकोट :खारपानपट्यात मोडणाऱ्या व अकोट तालुक्यातील वणी वारुळा परीसरात दि.२२सप्टेबर रोजी सायंकाळी ४चे सुमारास वादळीवाऱ्यासह पावसाने कहर केला असुन मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील वणी वारुळा परीसरातील मुडगांव,आलेगांव,बळेगांव, वणी, वारुळा,सोनबर्डी, तांदुळवाडी येथे आज दिनांक २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४वाजताचे सुमारास वादळीवाऱ्यासह पावसाने कहर केला असुन या वादळी पावसामुळे परीसरातील शेतीतील उभे असलेले पिके जसे सोयाबीन,तुर,कपासी,तिळ,मका या सारख्ये अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच गेल्या ७ दिवसा पासुन लगातार रोजच पाऊस पडत आहे या पावसामुळे शेतातील पिके सडू लागली आहेत.व त्यात आज झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने कहर केला असुन या पावसामुळे शेतातील पिके झोपली असुन जमिनीवर पडली आहेत.तेव्हा वणी वारुळा परीसरात शेतकऱ्यांचा वाली कोण असा प्रश्न उपस्थित होतो.
@@ वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीतील अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होत चालली आहे व या वर्षी पेरलेल्या बियाण्याची लागवडीसाठी केलेला खर्च निघेल अशी आशा नाही…. अशोक उर्फ नाना पाटील मोहोकार…. शेतकरी वारुळा@@ शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अधिकारी वर्गाला वेळ नाही व झालेल्या नुकसानीची दखल सुद्धा घेण्यात येत नाही…. अविनाश वांगे… शेतकरी मुडगांव.@@
आज झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने वणी वारुळा परीसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकऱ्याची परीस्थिती गंभीर आहे तेव्हा शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावे…. बाळु पाटील मोहोकार… शेतकरी वारुळा