दसरा मेळाव्यासाठी उच्च न्यायालयाने शिवसेना उद्धव ठाकरेला परवानगी दिल्याचा नाना पटोले यांनी केले स्वागत

Maharashtra State

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी उच्च न्यायालयाने शिवसेना उद्धव ठाकरेला परवानगी दिल्याचा स्वागत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहेय… राज्यात तेढ निर्माण करण्याचा कार्य राज्य सरकार करीत असल्याचा आरोप यावेळी नाना पटोले यांनी केलाय..भारत जोडो यात्रे संदर्भात ते अकोला दौऱ्यावर असताना बोलत होते… शिवसेनेची शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याची जुनी परंपरा आहे आणि त्यात अडथळा निर्माण करण्याचे काम राज्य सरकार करीत होते.. काँग्रेसचा राज्य असताना बाळासाहेब काँग्रेसला शिव्या जरी देत होते तरी मात्र आम्ही त्यांची ती परंपरा कायम ठेवली होती असे ही नाना पटोले म्हणाले…मात्र स्वतःला हिंदू हृदय सम्राट समजणारे मुख्यमंत्री यांनी अडथळा निर्माण करण्याचा काम केलं असल्याचं नाना पटोले यांनी म्हटले..तर राहुल गांधींनीच काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे, ही सर्वसामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. ते आम्ही पक्षाध्‍यक्षांकडे वारंवार मनातून बोलत आहोत. राहुल गांधी अध्यक्ष होत नसेल तर अशोक गहलोत यांनीच त्यांच्याशी विचार विमर्श करून अर्ज भरणार असल्याचा निर्णय घेतला असेल. तरीही आमची अजूनही इच्छा आहे की, राहुल गांधी यांनीच अध्यक्ष व्हावे, असेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *