ईडी सरकार लवकरच ‘धावबाद’ होईल-महेश तपासे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मेट्रो ३ च्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवताना आम्हाला कमी चेंडूत जास्त धावा करायच्या असल्याचं वक्तव्य केलं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने खोचक टोला लगावला आहे. “कमी चेंडूत जास्त धावा करायच्या नादात हे ईडी सरकार लवकरच ‘धावबाद’ होईल,” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला. राजकीय लालसेपोटी ‘ईडी’ सरकारकडून […]

Continue Reading

यंदा दसरा मेळावा शिवसेनेचा नसून शिंदे गटाचाच होणार? नरेश म्हस्केंचं मोठं विधान

गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे ती दसरा मेळाव्याची. दरवर्षी ही चर्चा ‘शिवसेनेचा दसरा मेळावा’ अशी सुरू असते. यंदा मात्र ती चर्चा ‘नेमका कुणाचा दसरा मेळावा?’ अशा सुरू आहे. त्याला कारण ठरली ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी आणि १२ खासदारांनी केलेली बंडखोरी. सध्या राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे […]

Continue Reading

“संघाची विचारसरणी भाजपाला मान्य आहे का? मोहन भागवतांनी…”, उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

राज्यात शिवसेना आणि भाजपाची युती तुटल्यापासून दोन्ही पक्षांमधील वितुष्ट कमालीचं वाढलं आहे. शिवाय आता शिवसेनेतून फुटून बाहेर पडत एकनाथ शिंदेंनी भाजपाशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे त्यांच्यातील वादाला चांगलीच धार चढली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण सुरू असतानाच शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडसोबत युतीची घोषणा केली आहे. दोन्ही पक्षांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार […]

Continue Reading

ज्येष्ठ नागरिकांना एसटी स्मार्ट कार्डासाठी मुदतवाढ

एसटी महामंडळाच्या विविध प्रकारातील सवलती अंतर्गत प्रवास करणाऱ्यांपैकी ज्येष्ठांना एक नोव्हेंबरपासून स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. ३१ ऑक्टोबर रोजी स्मार्ट कार्ड काढून देण्याची मुदत अखेर संपणार आहे. यापूर्वी शासनाकडून दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पुन्हा ही तिसरी असणार आहे. बसच्या सवलतीचा लाभ दिव्यांग, विविध योजना, पुरस्कार, स्वातंत्र्य सैनिकांसह कर्करोग, एचआयव्ही बाधित आणि थॅलेसिमियाग्रस्तानाही […]

Continue Reading

राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड, शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत युती!

एकीकडे शिवसेनेतील मोठा गट फोडून एकनाथ शिंदेंनी भाजपासोबत सरकार स्थापन केलं असताना दुसरीकडे राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेनं हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत […]

Continue Reading

विधिमंडळ कामकाजाला घोषणाबाजीने सुरुवात

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतरचं पहिलंच अधिवेशन सध्या सुरू आहे. त्यामुळे राजकीय दावे-प्रतिदावे आणि आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण अधिवेशनात पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली असून या मुद्द्यांवर सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी सज्ज आहेत.

Continue Reading

“या आमदारांना लाज वाटली पाहिजे”; विधानभवनातील धक्काबुक्कीवर रविकांत तुपकरांची संतप्त प्रतिक्रिया

आज अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान, स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी याप्रकारावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. नळावर जसे भांडणं होतात, तसे भांडणे हे विधान भवनामध्ये होत आहेत. या आमदारांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे, असे ते म्हणाले.विधानभवनाच्या पायऱ्यांवर हाणामारी करणाऱ्या […]

Continue Reading

“हे असं चालणार नाही, सभागृह बंद करा”-एकनाथ खडसे

राज्याचे पावसाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरत आहे. आज अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच दोन्ही सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी पाहायला मिळत आहे. काल (२३ ऑगस्ट) विधानसभेच्या सभागृहात मंत्र्यांच्या उपस्थितीवरून चांगलाच गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील चांगलेच आक्रमक झाले होते. दरम्यान आजदेखील विधानपरिषदेमध्ये अशीच स्थिती पाहायला मिळाली. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी संबंधित […]

Continue Reading

विधीमंडळ अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आज (२४ ऑगस्ट) सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी

विधीमंडळ अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आज (२४ ऑगस्ट) विधीमंडळ पायऱ्यांवर विरोधक घोषणाबाजी करत असताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांच्यात धक्काबुक्की झाली. या घटनेनंतर विधीमंडळातही मोठा गदारोळ झाला. दरम्यान, या घटनेनंतर शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी मिटकरी हे प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी माकडचाळे करत असतात, असे विधान केले. त्यांच्या याच विधाला […]

Continue Reading

आ.अमोल मिटकरींना धक्काबुक्की

सत्तारुढ – विरोधक आमने सामनेआ.महेश शिंदे – आ.मिटकरीमध्ये वाद विधिमंडळाच्या पायNयांवर आज अभूतपूर्व असा गोंधळ घडला आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी हाऊस सुरु होण्याआधी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले होते. यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. यावेळी शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं.विधान […]

Continue Reading