या भेटीमुळे केसकरांकडे या खात्याची जबाबदारी जाणार असल्याच्या चर्चा सुरू

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यात कॅबिनेटमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली, त्यात प्रामुख्याने जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरच्या विकासाबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. उदयनराजेंच्या या भेटीमुळे व पर्यटन विकासाच्या चर्चांमुळे मंत्रीमंडळ खातेवाटपा अगोदरच दिपक केसकरांकडे पर्यटन खाते जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.केसरकरांची भेट घेतल्यानंतर उदयनराजेंनी सांगितले की, […]

Continue Reading

मग मी शिवसेना माझी आहे असं म्हणायचं का?- उदयराजे भोसले

भाजपा खासदार उदयराजे भोसले यांनी शिवसेनेतील बंडखोरी आणि शिवसेना कुणाची यावर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाला टोला लगावला आहे. शिवसेनेत बंड झालाय का? असा खोचक सवाल उदयनराजेंनी केला. तसेच “शिवसेना शिवाजी महाजारांच्या नावाने स्थापन केली, मग मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे” असा प्रश्न उदयनराजेंनी केला. ते शुक्रवारी (१२ ऑगस्ट) पुण्यात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर […]

Continue Reading

‘महाराष्ट्रकन्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील’ या पुस्तकाचे उध्दवसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते प्रकाशन

अकोला: येथील सुप्रसिध्द साहित्यिक तथा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी सहसंपादक आतिश सुरेश सोसे यांनी लिहिलेल्या २००९ या वर्षी प्रकाशित झालेल्या ‘महाराष्ट्रकन्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील’या जीवनचरित्रपर पुस्तकावर सलग तेरा वर्ष अथक प्रयत्न करुन या पुस्तकाचे मूळ मराठी भाषेतील पुस्तकाचे आंतरराष्ट्रीय भाषा,भारतीय भाषा,बोली भाषा अशा एकूण चोवीस भाषांमध्ये,ब्रेल लिपी आणि मोडी लिपी मध्ये तसेच […]

Continue Reading

संजय राठोडांना मंत्रिपद मिळल्यानंतर शिवसेनेच्या सुषमा अंधारेंचे चित्रा वाघ यांना खुले आव्हान

मुबई : राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांचे संयुक्त सरकार स्थापन झाल्यानंर ४० दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. पहिल्या टप्यात शिंदे गटातील ९ आणि भाजपाच्या ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात गंभीर आरोप असलेले शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राठोड यांना पुन्हा एकदा मंत्रिपद […]

Continue Reading

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळामधील काही नेत्यांवर विरोधी पक्षांनी आक्षेप

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केल्यानंतर ३९ दिवसांनंतर राज्यमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे. राजभवनावरील शपथविधी सोहळ्याच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र या पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मंत्रिमंडळात असणाऱ्या सदस्यांऐवजी जे […]

Continue Reading

विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांची निवड झाल्याने जयंत पाटील नाराज

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. अजित पवारांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत विचारलं असता आपण नाराज नसल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं आहे. ते पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी अजित […]

Continue Reading

“आपल्या हातून भगवा खेचणं दूरच, त्याला हात लावायचा कुणी प्रयत्न केला तरी…”, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना साद!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार अस्तित्वात येऊन महिना उलटून गेला आहे. मात्र, अद्याप या दोघांव्यतिरिक्त एकाही मंत्र्याचा शपथविधी झालेला नाही. या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकरला लक्ष्य केलं असतानाच दुसरीकडे संख्याबळाच्या जोरावर शिंदे गटाने आपणच शिवसेना असल्याचा दावा करत पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. या पार्श्वभूमीवर हा वाद […]

Continue Reading

संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई : आजपासून संजय राऊत यांचा मुक्काम मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असणार आहे. संजय राऊत ईडी कोठडीत असताना त्यांना काही सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव राऊतांना त्याच प्रकारच्या सुविधा कारागृहात पुरवल्या जाव्यात, अशी मागणी संजय राऊत यांच्या वकिलांनी केली आहे. घरचं जेवणं, औषधं आणि हवेशीर खोली मिळावी, अशी मागणी राऊतांच्या वकिलांनी केल्याची माहिती समजत […]

Continue Reading

१०० गाड्यांमधून ४८० अधिकारी कर्मचारी दाखल

जालना: जालना एमआयडीसीतील दोन मोठ्या स्टील कंपन्या व त्या कंपन्यांशी संबंधित व्यावसायिकांसह १० ते १२ व्यावसायिक आणि शहर आणि जिल्ह्यात फायनान्स करणारे व्यावसायिक विमलराज सिंघवी यांच्यावर आयकर विभागाने छापे टाकले. या कारवाईमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. आयुक्त स्तरावरील दोन डझनहून अधिक अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते. सुमारे ४८० जणांच्या पथकाने जालन्यात तळ […]

Continue Reading

शिवलिंगाचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याप्रकरणी नितेश राणेंचा इशारा

काही दिवसांपूर्वी भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत अवमानकारक टिप्पणी केली होती. या आक्षेपार्ह विधानानंतर नुपूर शर्मा यांना पाठिंबा दिल्याच्या कारणातून उदयपूर याठिकाणी कन्हैय्यालाल नावाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. असाच प्रकार महाराष्ट्रातील अमरावती येथे देखील घडल्याचाही आरोप आहे. सध्या या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएकडून केला जात आहे. या […]

Continue Reading