पालकमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीत विविध विषयांवर चर्चा
अकोला,
आरोग्य उपसंचालक डॉ.राजकुमार चव्हाण यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचाराचा मुद्दा आज जिल्हा नियोजन समितीत गाजला. त्याच बरोबर सुपर स्पेशालिटी लवकरात लवकर सुरु करावे तसेच महापालिकेची नालेसफाई, बियाणे आणि खतांचा काळे बाजार या विषयांवर जोरदार चर्चा झाली. अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन मध्ये जिल्हा नियोजन समिती ची सभा घेण्यात आली. पालकमंत्री बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हा नियोजन समिती ची सभा घेण्यात आली, या वेळी जिल्यातील विविध विकासात्मक विषयांबाबत चर्चा करीत त्या बाबत कारवाई करण्यात आली.
या वेळी आमदार नितीन देशमुख, अमोल मिटकरी, रणधीर सावरकर, वसंत खंडेलवाल, प्रकाश भारसाकळे, हरीश पिंपळे, गोवर्धन शर्मा, किरण सरनाईक, डॉ. रणजित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष वाघोडे, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, उप वन स्वरक्षक के.आर.अर्जुना यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
सभेमध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील १०८ रुग्णवाहिकाची अवस्था चांगली नसल्याने नवीन वाहने कार्यान्वित करावे. अकोला शहरातील तरण तलाव च्या विकासासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत निधी देण्यात यावा. मूर्तिजापूर तालुक्यातील विजेचा प्रश्न उद्धवतो त्याचे नियोजन करावे, मूर्तिजापूर येथील वाई गावा जवळील नाल्याच्या कामाचे नियोजन करून शेतकNयांना दिलासा द्यावा, अकोला शहरातील ऑक्सिजन प्लँट ची तपासणी करून त्यांना कार्यान्वित करावे.
अकोला आरोग्य उपसंचालक यांच्या कार्यालयाने घेतलेल्या बदली मधील आर्थिक घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी या वेळी करण्यात आल्या. मनपा च्या सर्व शाळेची तपासणी करून जीर्ण शाळेचा वापर तात्काळ टाळावा. जेणे करून कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी या वेळी करण्यात आली. १२ कोटी खर्च करून तयार केलेले सांस्कृतिक भवनाकडे लक्ष देत त्याचे काम त्वरित करण्याची मागणी करण्यात आली. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लवकर सुरू करावे, जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांकरिता साहित्य वाटप जिल्हा नियोजन मधून करण्याची मागणी या वेळी करण्यात आली, जिल्ह्यात खताची साठीबाजी होऊ नये याची दक्षता घ्यावी, अकोट तेल्हारा येथील रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, पूर्णा नदी मधील दूषित पाण्या संदर्भात उपाययोजना करावे, मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी मध्ये ज्या शेतकNयांचे नुकसान झाले त्याना तात्काळ मदत घ्यावी, मनपा क्षेत्रात नाले सफाई पावसाळ्या पूर्वी झाली नाही. त्या बाबत त्वरित कारवाई करावी याच सोबत इतर विषयांवर नियोजन समितीच्या सभेत चर्चा करण्यात आली.