महापालिका प्रशासन देईल का लक्ष
नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांच्या पातळ्या वाढल्या आहेत. त्यामुळे महानगरातील पाणी पुरवठा हा अवकाळी होत आहे. पाणी पुरवठा हा केवळ जास्त प्रमाणात होणे गरजे चे नसून तो पिण्या योग्य असणे देखीले गरजेचे आहे. शहरात ठीकठिकाणी जलवाहिन्या फुटलेल्या ची स्थितीत दिसून आल्या आहेत.
शहरातील अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटलेल्या अवस्थेत आहेत. पाण्याचा अपव्यव जरी होत असला तरी महानगरातील नागरिकांना शुद्ध तसेच पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा होतो आहे की नाही याची उलटतपासणी करणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या दिवसात अनेक प्रकारचे साथीचे रोग फैललेले असतात, असे असताना महानगर पालिका प्रशासनाने आपल्या जलवाहिन्याची योग्य देखभाल व दुरुस्ती न केल्याने नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. या ठीक ठिकाणी फुटलेल्या जलवाहिन्यांना महानगरपालिका प्रशासनाने आपली जवाबदारी समजून दुरुस्त करण्याची गरज आहे.