पुणे,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. विद्याथ्र्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थीनी ९७.९६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाNया मुलांचं प्रमाण ९६.०६ टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणा?्या मुलांपेक्षा १.०९ टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.
राज्यात १५ लाख ६८ हजार ९७७ विद्याथ्र्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ लाख २१ हजार ००३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. कोकण विभागात सर्वाधिक ९९.२७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, सर्वाधिक कमी निकाल नाशिक विभागाचा लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल ९५.९० टक्के इतका लागला असल्याची माहिती महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीची परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हती. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यानंतर मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतिक्षा संपली असून आज दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी खालील संकेत स्थळाची लिंक क्लिक करा, टच करा.
सर्व विद्याथ्र्यांना शुभेच्छा..!
1. Best Luck, SSC Result RRC News,Akola Link या लिंक ला क्लिक करा, स्पर्श करा, टच करा
2. Best Luck, SSC Result RRC News,Akola Link या लिंक ला क्लिक करा, स्पर्श करा, टच करा
३. Best Luck, SSC Result RRC News,Akola Link या लिंक ला क्लिक करा, स्पर्श करा, टच करा
स्टेप १ : वरील कुठल्याही एका संकेत स्थळावर क्लिक करा.
स्टेप २ : दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा
स्टेप ३ : तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका
स्टेप ४ : तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा
स्टेप ५ : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल
स्टेप ६ : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा