– राज्यभरातून भक्तांची मांदियाळी जल्लोषात केले स्वागत
शिरपूर जैन: आज महामुनी संत आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचे संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंतरिक्ष नगरीमध्ये मोठ्या जल्लोषात भव्य अशी अगवाणी झाली आहे. महाराज साहेबांच्या या भव्यदिव्य अगवाणी मध्ये संपुर्ण राज्यभरातून तथा अंतरिक्ष पंचकोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने पहाटेपासून आचार्य विद्यासागर महाराज यांच्या स्वागतासाठी हजर होते. महामुनी आचार्य विद्यासागर महाराज यांनी सकाळीच मालेगाव वरून शिरपूर जैन कडे भक्तांसोबत प्रस्थान केले होते सकाळीच सात वाजता महामुनी संत आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे अंतरिक्ष नगरीमध्ये मोठ्या उत्साहात राज्यभरातून आलेल्या आणि अंतरिक्ष च्या पंचकोशीतील भक्तांनी जोरदार स्वागत केले. महामुनी संत आचार्य विद्यासागर महाराज यांनी सर्वप्रथम अंतरिक्ष पार्श्वनाथ यांचे दर्शन घेऊन आलेल्या भक्तांना प्रवचन देऊन एक मोलाचा संदेश देऊन त्यांना आहार चर्ये करिता प्रस्थान केले त्यावेळेस महामुनी संत आचार्य विद्यासागरजी महाराज यांनी भगवान अंतरिक्ष पार्श्वनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन नमन करून मनामध्ये आकडी पकडून आहार चर्ये करिता निघाले भगवान अंतरिक्ष पार्श्वनाथा च्या मंदिर परिसरामध्ये शेकडो भाविक भक्तांनी चौके लावून पडघान केले शेकडो चौक्यांमधून ऐका हितेश रिवाले या भक्तांच्या चौक्याची पडघान झाले आणि हितेश रिवाले कारंजा यांच्याकडे महाराज साहेबांची आहार चर्या सानंद संपन्न झाला. हजारो भाविकांनी महाराज साहेबांच्या आहार चर्या दर्शन घेतले. यामुळे महामुनी संत आचार्य विद्यासागरजी महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंताची ही पावन भूमी आणि येथील संपूर्ण समाज बांधव आणि संपूर्ण गावकरी मंडळींचे आणि राज्यभरातून आलेल्या भाविक भक्तांचे कल्याण होण्याकरिता महामुनी संत आचार्य विद्यासागरजी महाराज यांचे शिरपूर नगरीमध्ये मोठ्या उत्साहात चातुर्मास करिता आगमन झालेले आहे. संपूर्ण शिरपूर वासीयांकडून त्यांच्या चरणी नतमस्तक नामोस्तू गुरुदेव.