मुंबई इंडियन्सचा संघ मिनी आयपीएलमध्ये खेळणार, कुठे आणि कधी होणार स्पर्धा जाणून घ्या…

Sport

भारतामध्ये आयपीएलमध्ये म्हणजे बीसीसीआयसाठी सोन्याची अंड देणारी कोंबडी ठरली आहे. आतापर्यंतच्या प्रत्येक हंगामात त्यांनी चांगलाच नफा कमावला आहे. गेल्यावर्षी आयपीएलमध्ये आठ संघ होते. पण यावेळी आयपीएलमध्ये अजून दोन संघांना प्रवेश देण्यात आला. त्यामुळे या वर्षी आयपीएलमध्ये १० संघ खेळवले गेले होते. पण ही मिनी आयपीएल कधी होणार आहे, जाणून घ्या…

मुंबई : सध्याच्या घडीला मिनी आयपीएलची तयारी आता जोरात सुरु झाली आहे. या मिनी आयपीएलमध्ये आता मुंबई इंडियन्सचा संघ उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पण ही स्पर्धा बीसीसीआय भरवणार नसून ती भारताबाहेर होणार आहे. ही स्पर्धा पुढच्या वर्षी फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांमध्ये खेळवण्यात येणार आहे.मिनी आयपीएल ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट मंडळ आयोजित करणार आहे आणि स्पर्धेत ९ संघ असतील. पण या ९ मधील सहा संघ हे आयपीएलमधील असतील, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. कारण या लीगसाठी संघांनी अर्ज करायची तारीख ही १३ जुलै होती आणि यामध्ये आता आयपीएलमधील सहा संघांनी अर्ज केल्याचे समोर आहे आहे. त्यामध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स या संघाच्या मालकांनी अर्ज केला आहे. या संघांना मिनी आयपीएलमध्ये प्रवेश मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मुंंबई इंडियन्सचा संघ यामध्ये केप टाऊनमध्ये सराव करण्यासाठी उत्सुक आहे, तर चेन्नई सुपर किंग्सचा संघ हा जोहान्सबर्गमध्ये आपल्या खेळाडूंसाठी सराव प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *