महापालिकेच्या OBC व खुल्या प्रवर्गातील त्या जागांची सोडत या दिवशी निघणार, महापालिका निवडणूकांचा बिगुल फुंकला

अकोला ताज्या घड्यामोडी ब्रेकिंग महापालिका निवडणूक

अकोला,

अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला) अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती (महिला) यांच्या आरक्षणामध्ये कोणताही बदल होत नाही. मात्र सर्वसाधारण महिलांची सोडत रद्द करुन नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांची सोडत नव्याने काढणे आवश्यक झाली ही सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका (सिव्हील) १९७५६ / २०२१ मध्ये दि. २० जुलै २०२२ रोजी दिलेल्या आदेशास अनुसरुन राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या सदस्य संख्या, प्रभाग रचना व आरक्षण याबाबतचे दि. २८ डिसेंबर, २०२१ चे आदेश सुधारीत केले आहेत. त्यास अनुसरुन आता समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात मात्र एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्यावर जाणार नाही या मर्यादेत नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता जागा राखून ठेवावयाच्या आहेत.

नवी मुंबई, वसई विरार, कल्याण-डोंबिवली. कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला व नागपूर या १३ महानगरपालिकाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्या आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता आरक्षण सोडत काढण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आदेश दिला आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती व अनुसूचित जमाती (महिला) यांचे आरक्षण हे लोकसंख्येच्या उत्तरत्या क्रमाने होत असल्याने व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता जागा राखून ठेवल्यामुळे या आरक्षणात कोणताही बदल होत नसल्यामुळे सदर आरक्षण दि. ३१ मे, २०१२ रोजी काढण्यात आलेल्या सोडतीनुसार राहील.

दि. ३१ मे २०२२ रोजी काढण्यात आलेले सर्वसाधारण महिलांचे आरक्षण याद्वारे रद्द करण्यात येत आहे.

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्या आरक्षण सोडतीचा व आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडतीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्या आरक्षण निश्चित होणार आहे.

नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला व नागपूर या १३ महानगरपालिकांचा आरक्षण व सोडत कार्यक्रम २०२२ जाहिर करण्यात आला आहे.

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडत काढणे सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप २७ जुलैला प्रसिध्द करणे. २९ जुलै रोजी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांची सोडत नव्याने सोडत काढण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *