
अकोला : थायलँड आर्मी स्टेडियम बँकॉक (याला ).येथे थायलँड टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशन व ऑल स्पोर्ट्स को – ऑर्गनायझेशन व गव्हर्मेंट ऑफ थाई स्पोर्टस अथोरिटी थायलंड आयोजित एशियन टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशन च्या मार्गदर्शनाखाली 17 जुलै ते 22 जुलै दरम्यान संपन्न झाल्या. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील तिघांनी लखनऊ येथे झालेल्या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत स्वर्ण पदक मिळवत यापूर्वीच भारतीय संघात आपले स्थान पक्के केले होते मिनिस्ट्री ऑफ युथ अफेयर्स अँड स्पोर्ट्स गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया आधिपत्याखाली काम करत असलेल्या टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडिया च्या माध्यमातून भारतीय संघ थायलंड येथे खेळला यामध्ये अकोल्यातील टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ अकोला डिस्टिक चे खेळाडू १)समर्थ नंदकिशोर सोनोने २) ध्रुव अविनाश कांगटे ३) संकेत विजय सरदार यांचा समावेश पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाला होता आणि आता ही स्पर्धा जिंकून तीन खेळाडूंनी अकोल्यातील टेनिस बॉल क्रिकेट च्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरात अधोरेखित केले आहे.

या विजयी खेळाडूना आंतरराष्ट्रीय ख्यातनाम ज्येष्ठ प्रशिक्षक शिवाजीराव चव्हाण त्यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले त्यांच्या या यशाबद्दल रेल्वे स्टेशन येथे बहुसंख्येने पालक व मित्रमंडळी उपस्थित होते, काँग्रेस क्रीडा सेल चे संजय देशमुख, संघटनेचे अध्यक्ष आनंद वानखेडे, युवा काँग्रेसचे महेश गणगणे, शरद पवार, आशिष कांबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी, योगेश तिवारी यांनी विजयी खेळाडूंचे अभनंदन