पूरग्रस्त गावामध्ये पोलीस पाटलांनी बजावले आपले कर्तव्य

अकोला

मोरझाडी : उरळ गावातील पोलीस पाटील महादेव घोडसकार यांनी आपल्या गावामध्ये फार महत्वाची भूमिका बजावल्याचे दिसत आहे. गावामध्ये गेल्या अनेक दवसापासून संततधार पावसाचे आगमन सुरु असतांना गावामध्ये अनेक ठिकाणी पावसाचे पाणी शिरले असतांना नागरिकांना सुरक्षित कसे करता येणार या साठी प्रयत्नशील राहिले सोबतच गरजूंना वेळोवेळी मदत देखील त्यांनी केल्याचे समोर आले आहे. सोबतच त्याचबरोबर हिंगोली येथील श्री संतोष पाटील बोर्डे यांनी सुद्धा आपल्या गावासाठी चांगले उत्कृष्ट काम केले, घोडसकार यांनी पूर परिस्थितीत गावामध्ये योग्य पद्धतीने नियोजन करून गावातील लोकांना सुरक्षित करण्याचे मोठे मोलाचे काम केले, पूर परिस्थितीमध्ये अनेकवेळा आर्थिक हानी अथवा जीवित हानी होतांना दिसते याच अनुषंगाने पूर्वनियोजित आराखडा करून लोकांना मार्गदर्शन करण्याचे कार्य गावातील पोलिसपाटलांनी केल्याचे दिसते ज्या मुळे संपूर्ण गावात केलेल्या कार्याचे कौतुक केल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *