जि.प.सदस्य शंकरराव इंगळे यांनी घेतला होता पुढाकार
श्रीमती सिमाताई घोडे यांचा गृहप्रवेश .
अकोला जिल्ह्यातील आपतापा येथील सीमाताई घोडे यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी दुर्धर आजाराने निधन झाले. पतीच्या अचानक निघून जाण्याने सीमा घोडे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र जिल्हा परिषद सदस्य शंकरराव इंगळे यांनी पुढाकार घेत निराधार घोडे परिवाराला हक्काचं घर मिळवून दिलं.
पतीच्या निधनामुळे तीन लहान मुलांचे पालन पोषण कसे करावे हा प्रश्न सिमाताईंपुढे होता. त्यात ताट्यांच्या व कुळाच्या घराचा आसरा, अशातच जिल्हा परिषद सदस्य शंकरराव इंगळे यांनी पुढाकार घेत ग्रामपंचायतच्या साहाय्याने निराधार घोडे परीवाराला मदतीचा हात पुढे केला. आणि वर्गणी गोळा करून त्यांना हक्काचं घर बांधून दिल. एका छोटेखानी कार्यक्रमात विधिवत पूजा विधी करीत श्रीमती सिमा घोडे व त्यांच्या तीन मुलांचा स्वतः च्या हक्काच्या घरात गृहप्रवेश झाला.