त्या नालीचे काम अद्याप प्रलंबित

अकोला

ठेकेदाराकडे पैशांची चणचण
नागरीकांच्या गाड्यांची झाली अडचण


जुन्या आर टी ओ रोड वरील नालीचे काम करण्याचे आश्वासन महापालिकेने दिले. पण, वंâत्राटदाराच्या खिशात पैशांची चणचण असल्याने या भागातील नागरीकांना मोठी अडचण होत आहे. तर अनेक वाहने हे खोदलेल्या नालीत पडत आहे.


गेल्या महिन्याभरापासून हा त्रास जुन्या आर टी ओ कार्यालय जवळचे नागरीक सहन करत आहे. या भागातील गटार वाहून जाण्यासाठी नालीची आवश्यकता होती. ती पुर्ण करण्यासाठी महापालिकेने एका वंâत्राटदाराला वंâत्राट दिला. पण, त्याच्याकडे पैशांची चणचण असल्याने त्या वंâत्राटदाराने नाल्या खोदल्या पण, त्याचे बांधकाम करण्यासाठी त्याच्या जवळ पैसेच नसल्याने या खोदलेल्या नाल्या जैसे थे ठेवल्या गेल्या. आता त्याचा फटका या भागातील दूचाकी चालकांना, ऑटो चालकांना आणि फोर व्हिलर चालकांना बसत आहे. काहींच्या गाड्या या नाल्यात पडल्या असून नागरीकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाचे दूर्लक्ष असून कर भरणाNया नागरीकांचे मोठे हाल शहरात होत असून महापालिका डोळे बांधुन बसले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *