अकोट : बोर्डी:- पोपटखेड आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या बोर्डी उपकेंद्रात बोर्डी गावात हत्तीपाय रोग, व कीटक शास्त्रीय सर्व्हेक्षण घरोघरी करण्यात येत आहे.यामध्ये डासा बद्दल् माहिती व हत्तीरोग बद्दल माहिती देण्यात आली.हत्ती पाय रोग हा ‘बुचेरिया बॅनक्रॉप्टी’ या परोपजीवी बॅक्टेरियामुळे होत असतो. ह्या बॅक्टेरियाचा प्रसार ‘क्युलेक्स’ जातीच्या मादी डास चावल्याने होत असतो. डासांमार्फत बॅक्टेरिया रक्त व लसिका संस्थेत पोहचून हळूहळू आपली संख्या वाढवत असतात. त्यामुळे याची लक्षणे हळूहळू जाणवतात. यामध्ये पाय, हात आणि जननेंद्रिय यांच्या ठिकाणी सूज येते. शरीरात बॅक्टेरिया अधिक प्रमाणात वाडल्यास आजार वाढून पायाच्या ठिकाणी अतिशय सूज येऊन पाय हत्तीच्या पायासारखा वाटतो. डासांमुळे पसरणारे साथीचे रोग बॅक्टेरिया किंवा व्हायरस बाधित डास चावल्यामुळे आजार प्रामुख्याने पसरत असतात. मलेरिया किंवा हिवताप, डेंग्यू, चिकून गुणिया, हत्तीपाय रोग,झिका व्हायरस, हे आजार पसरतात. डासांपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना डासनाशक साधनांचा वापर करावा.झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.घरात डास येऊ नयेत यासाठी खिडक्यांना जाळ्या लावा.घराचा परिसर स्वच्छ ठेवावा.घराच्या आजूबाजूला पाणी साठू देऊ नका. जेणेकरून डासांची पैदास थांबण्यास मदत् होईल.घरातील फिशटॅन्क, फुलदाणी यातील पाणी बदला. व आठवड्यातून एक दिवस कोरडा पाडणे,अशा उपाययोजना घरोघरी जाऊन सांगण्यात आल्या. सर्व्हेक्षण करते वेळी बोर्डी केंद्राचे आरोग्य सेवक श्री. एस.टी. बुध, आशा स्वयंम सेविका कल्पना वाघमारे, जयश्री लाहोरे,अनिता वाघमारे,व दिक्षाताई कपिल रजाने ग्रा.पं सदस्य हजर होते.